मलकापूर

Showing of 66 - 76 from 76 results
कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीची बाजी

बातम्याDec 12, 2011

कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीची बाजी

12 डिसेंबरकोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळताना दिसत आहे. खासदार सदाशिवराव मंडलीक यांची सत्ता असलेलं मुरगुड नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालंय. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने यश मिळवलं आहे. त्यामुळे खासदार सदाशिवराव मंडलीक यांना मोठा धक्क ा बसला आहे. मुरगुड नगरपालिका (राष्ट्रवादी ) - मुरगुड नगरपालिकेमध्ये खासदार सदाशिवराव मंडलीक यांना धक्का लागला. मंडलीक गटाला फक्त 4 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि रंजीत पाटील गटाला चक्क 13 जागा मिळाल्यात. मुरगुड नगरपालिकेमध्ये खासदार सदाशिवराव मंडलीक यांची निर्विवाद सत्ता कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी उलथवून लावली आहे. कागल (राष्ट्रवादी + शाहु आघाडी सत्ता) - नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी - शाहु आघाडीने सत्ता मिळवली आहे. 17 पैकी 15 जागा या आघाडीने मिळवल्या आहेत. तर काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्यात. कागल नगरपालिकेची निवडणुक अत्यंत चुरशीची मानली जात होती. इथं कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार सदाशिवराव मंडलीक यांच्या गटामध्येच थेट लढत होती. पन्हाळा नगरपालिका ( जनसुराज्या पक्ष) - पन्हाळा नगरपालिकेवर पुन्हा जनसुराज्य पक्षाने सत्ता मिळवली आहे. इथं 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या. ह्या चारही जागा जनसुराज्य पक्षाने आधीच मिळवल्या होत्या. त्यानंतर 15 जागांसाठी मतदान झालं. यामध्ये पंधराच्या पंधरा जागा जनसुराज्य पक्षानं जिकल्या. जनसुराज्यच्या विरोधात काँग्रेस पक्ष उभा होता.पेठवडगांव नगरपालिका ( काँग्रेस - यादव पॅनेल) - पेठवडगांव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत यादव पॅनेलनं सत्ता मिळवली आहे. इथं 17 जागापैकी 13 जागा यादव पॅनेलनं मिळविल्या आहेत. तर विरोधी राष्ट्रवादीला फक्त 4 जागेवर समाधान मानावं लागलं आहे.कुरुंदवाड नगरपालिका (काँग्रेस - पाटील आघाडी) - कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये संयुक्त पाटील आघाडीनं सत्ता मिळवली आहे. काँग्रेस पक्ष - संयुक्त पाटील आघाडीला 10 जागा तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळाल्या आहे. गडहिग्लज (राष्ट्रवादी) - गडहिग्लज नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीनं 17 पैकी 9 जागा मिळवून सत्ता खेचून आणण्यात यश मिळवलं आहे. इथं काँग्रेस-जनसुराज्य आणि जनता दल आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. इथल्या सत्तेसाठी राष्ट्रावादीचे नेते आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी कंबर कसली होती.मलकापूर नगरपालिका ( राष्ट्रवादी + जनसुराज्य पक्ष) - मलकापूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी-जनसुराज्यची सत्ता आलेली आहे. राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्ष यांना प्रत्येकी सहा सहा जागा मिळाल्या आहे. तर शहर विकास आघाडीला फक्त पाच जागा मिळाल्या आहे.