#मनसे

Showing of 1535 - 1548 from 1776 results
रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे शिवाजी पार्कवर वाचणार 14 कोटी लिटर पाणी !

बातम्याMay 13, 2013

रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे शिवाजी पार्कवर वाचणार 14 कोटी लिटर पाणी !

मुंबई 13 मे : सार्वजनिक ठिकाणी पहिला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प शिवाजी पार्क मैदानात राबवण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत क्रिकेट पंच माधव गोठोस्कर यांच्या हस्ते सोमवारी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येतंय. मनसेतर्फे राबवण्यात येणार्‍या या प्रकल्पामुळे दरवर्षी मेदानाच्या परिसरात पडणारं 14 कोटी लीटर पाणी वाचवणं शक्य होणार आहे. त्यामुळे यापुढे शिवाजी पार्क मैदानावर फवारण्यासाठी महापालिकेतर्फे पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही. राज ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रस्ताव महापालिकेमार्फत मार्गी लावण्यासाठी मनसेतर्फे गेले वर्षभर प्रयत्न सुरू होते. पण अपुर्‍या निधीची कारण देत महापालिकेनं हा प्रकल्प राबवण्यासाठी असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे आता हा प्रकल्प मनसेचे स्थानिक आमदार नितीन सरदेसाई हे स्वखर्चातून उभारत आहेत. या प्रकल्पासाठीच्या सर्व परवानग्या मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी मिळवल्या आहेत.

Live TV

News18 Lokmat
close