News18 Lokmat

#मध्यप्रदेश

Showing of 53 - 66 from 263 results
VIDEO : मी बोललो तर काँग्रेसची मतं कमी होतात, त्यामुळं प्रचारापासून दूर - दिग्विजय सिंग

व्हिडिओOct 17, 2018

VIDEO : मी बोललो तर काँग्रेसची मतं कमी होतात, त्यामुळं प्रचारापासून दूर - दिग्विजय सिंग

भोपाळ,ता.17 ऑक्टोबर : मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू असताना माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग हे मोठ्या प्रचारसभांपासून दूर आहेत. मी बोललो तर काँग्रेसची मतं जातात असं त्यांनी भोपाळमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं त्यामुळं मध्यप्रदेशात चर्चेला तोंड फुटलंय. ही स्वप्न पाहण्याची वेळ नाही तर काम करण्याची वेळ आहे. ही संधी हातातून गेली तर पुन्हा येणार नाही त्यामुळं कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असंही ते म्हणाले. तुमच्या शत्रूला जरी तिकिट मिळालं असेल तरीही तुम्ही त्याला जिंकून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. दिग्विजय सिंग हे राज्यातल्या काँग्रेस समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. दिग्विजय सिंग यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.