मध्यप्रदेश

Showing of 287 - 300 from 312 results
सिंधुदुर्गमध्ये स्पिरीटने भरलेल्या ट्रककडे पोलीसांचे दुर्लक्ष

बातम्याNov 15, 2010

सिंधुदुर्गमध्ये स्पिरीटने भरलेल्या ट्रककडे पोलीसांचे दुर्लक्ष

15 नोव्हेंबरसिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांनी पकडलेला टँकर मुंबई गोवा महामार्गावर, तसेच पोलिस वसाहतीत अत्यंत धोकादायक स्थितीत उभे करून ठेवण्यात आले आहे. या टँकर्समधून स्पिरीटची तस्करी केली जात होती. दारुसाठी वापरण्यात येणा-या या स्पिरीट आणि अल्कोहोलची तस्करी करणारे टँकर मध्यप्रदेश, पंजाब आणि गुजरात मधून गोव्याकडे जातात. आत्तापर्यंत पकडण्यात आलेल्या टँकरमधील स्पिरीट कुठे आणि कोणाकडून पाठवण्यात येते याचा सुगावा अजूनपर्यंत प्रशासनाला लागलेला नाही.तसेच पकडण्यात आलेल्या टँकरमधील स्पिरीट लिलाव करण्यासाठी वर्ष ते दोन वर्ष लागत असल्यामुळे स्पिरीट भरलेले हे टॅन्कर कुठेही उभे केले जातात. याबद्दल नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र तरीही प्रशासनाकडून काहीही उपाय योजना करण्यात आली नाही. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

ताज्या बातम्या