News18 Lokmat

#मध्यप्रदेश

Showing of 222 - 235 from 263 results
विदर्भात पावसाचे धुमशान

बातम्याJul 31, 2012

विदर्भात पावसाचे धुमशान

31 जुलैविदर्भातल्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूरमध्ये येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वेणा, कन्हान, पेंच, वैनगंगा आणि सूर या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी वादळी वार्‍यामुळे झाडे कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकही खोळंबली आहे. या अतीवृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील वाघनदीवर असलेला पूल पाण्याखाली बुडाला आहे. राज्य महामार्ग क्रमांक 17 वरील हा पूल 2 मीटर पाण्याखाली असल्याने वाहनांच्या दोन्ही बाजूस रांगा लागल्या आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या 2 राज्यांना जोडणारा हा पूल आहे. वाघनदीकाठच्या गावांना प्रशासनाने पुराचा इशारा दिला आहे.