भीम आर्मी Videos in Marathi

VIDEO : भीमा कोरेगाव : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद  नजरकैदेत

बातम्याDec 28, 2018

VIDEO : भीमा कोरेगाव : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद नजरकैदेत

मुंबई 28 डिसेंबर : उत्तर प्रदेशातल्या वादग्रस्त भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवलंय. चंद्रशेखर आझाद उर्फ आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या महारष्ट्रात सलग 4 सभांचं आयोजन करण्यात आलंय. चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यास मनाई केलीय. आझाद यांना मालाडमधल्या मनाली हॉटेलमधून बाहेर पडण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. आझाद जाहीर सभा घेणार नसतील तरच बाहेर सोडणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं असल्याचा आरोप भीम आर्मीनं केलाय.