मुंबई, 19 फेब्रुवारी : भिवंडी तालुक्यातील मौजे वाकलन गावात आखाड्यातच कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू झालाय. परशुराम पाटील असं कुस्तीपटूचं नाव असून ते 65 वर्षांचे होते. कुस्तीची आवड असलेले पाटील हे वयाच्या साठीनंतरही कुस्ती खेळत होते. वाकलन गावच्या जत्रेनिमित्त ते कुस्ती खेळण्यासाठी गेले होते. यावेळी एका कुस्तीपटूसोबत त्यांचा सामना सुरू होता. यावेळी झालेल्या झटापटीत कुस्तीपटूनं त्यांना जमिनीवर आपटलं. यावेळी डोक्याची नस दबल्यानं ते जागेवरच बेशुद्ध पडले. रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.