मुंबई, 23 एप्रिल : नोटबंदीची चौकशी झाल्यानंतर तो देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा ठरेल, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. तसंच विरोधक झाल्यावर मोदी-शहांभोवती ईडीच्या चौकशीचा फास आवळला जाईल, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुंबईतल्या काळाचौकीच्या सभेत त्यांनी भाजप सरकारवर चहुबाजूंनी हल्ला चढवला. तसंच शिवसेनेला मत देणं म्हणजे मोदी-शहांना मत देणं असल्यानं सेनेलाही मतदान करू नका, असं खुलं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.