#भाषण

Showing of 287 - 288 from 288 results
ग्रेट भेट कविता करकरेंशी (भाग : 1)

May 13, 2013

ग्रेट भेट कविता करकरेंशी (भाग : 1)

मुंबईचा रोजचा दिवस हा असाच धावपळीचा असतो. माणसं चालतात. पाऊलं चालतात. गाड्या चालतात. चाकं चालतात. घड्याळ्यांच्या काट्यांवर सगळेच चालतात. लाटा येतात, जातात. बोटी येतात, जातात. काही क्षण विसाव्याचे थकून विश्रांती घेतात. मग पुन्हा चालतात. रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या रांगा पेटतात, दिवे झगमगतात, गाड्या धावतात, घोडे धावतात. स्वप्न धावतात. स्वप्नांमागून माणसं धावतात... कधी एकमेकांना पाडून धावतात. रोजच्या आशा दिवस रात्रींना किनारा रोजच साक्षीला असतो... रोजचा समुद्र साक्षीला असतो. त्याच साक्षीनं 26 नोव्हेंबर 2008 ची रात्र मुंबईत होते. जेव्हा धीर खचतो... आत्मविश्वास खचतो... आणि त्या पाठोपाठ माणूसही खचतो. कित्येकांची स्वप्नं खचतात... कित्येकांचे संसार खचतात आणि कित्येकांची आयुष्यही... आणि घडतं ते एकाच वेळी आणि घडवणारे असतात फक्त दहा... बळी पडलेल्यांची संख्या मोजता येईल... पण खचलेल्यांची नाही. मुंबई हे स्वप्नाचं शहर, ही गोष्ट आता जुनी आहे. पण एकाच वेळी अनेकांची स्वप्न बेचिराख होणा-यांचंही स्वप्नं आहे ही गोष्ट नवी आहे. मात्र आजच्या ग्रेटमध्ये याच राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणं उड्डाण करणा-यांचंही हे मुंबई शहर आहे हे पटवणार आहोत... ही फिनिक्स भरारी धैर्याची आहे... विचारांची आहे... आणि त्याही पलीकडे एका माणुसकीची आहे. आजची ग्रेटभेट ही वेगळी आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्या घरी आपण आहोत. या घराचा प्रत्येक कोपरा करकरे यांची आठवण जागवत आहे. आपल्यासोबत आहेत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे - निखिल वागळे : कविताताई 26 डिसेंबरला तुम्ही एका कार्यक्रमाला गेला होता. आणि तिथे बोलताना असं म्हणालात की, 26 नोव्हेंबर हा दिवस सर्वधर्मसमभाव दिन म्हणून पाळला पाहिजे. तुम्ही असं का म्हणाला नाही, की हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळा किंवा दहशतवादविरोधी दिन म्हणून पाळा. वैयक्तिक दु:ख बाजूला सारून काहीतरी वेगळं तुमच्या मनात होतं, ते काय होतं ?कविता करकरे : माझ्यावर लहानपणापासूनच सर्वधर्मसमभावाचे संस्कार झाले आहेत. माझे वडील पोलीस खात्यात होते. ते मला चर्चमध्ये, मशिदीत घेऊन जायचे. मंदिरात आम्ही जायचोच. असे संस्कार माझ्यावर झाले होते आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटात अतिशय महत्त्वाचा असा धागा शोधून काढला आहे. त्यांची अवस्था अर्जुनाप्रमाणे झाली होती. पण महाभारतातला अर्जुन हा गोंधळात पडलेला होता की ...करावं की नाही यासाठी त्याला श्रीकृष्णाची मदत लागली होती. पण हेमंत करकरे यांना कुठल्याही श्रीकृष्णाची मदत लागली नाही. श्रीकृष्ण त्यांच्या मनात होता किंवा लहानपणापासून झालेल्या त्यांच्या संस्कारात होता. त्यामुळे अतिशय निरपेक्षवृत्तीने त्यांनी तो शोध लावलेला आहे. त्यांनी जे काम पूर्ण केलेलं आहे. तर हा सर्वधर्मसमभावाचा संस्कार माझ्यातही आहे. माझ्या पतीतही होता आणि मला अतिशय महत्त्वाचं वाटलं की पतीनंतर मला पुढे त्यांचं कार्य पूर्ण केलं पाहिजे. म्हणून मी माझं वैयक्तिक दु:ख बाजूला सारून सांगितलं की हा दिवस सर्वधर्मसमभावाचा दिवस म्हणून पाळला जावा.भाईचा-याचा दिवस म्हणून पाळला जावा. म्हणजे मला जे विधवेचं, एकलेपणाचं दु:ख भोगावं लागलं आहे ते इतर स्त्रियांना बघावं लागणार नाही.निखिल वागळे : मला सांगा तुम्ही आता म्हणालात की, पतीचं अपुरं राहिलेलं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे... काय आहे ते काम?कविता करकरे : काम हेच आहे की त्यांनी जो सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे. हिंदू-मुस्लीम यांच्या मृत्यूनं जोडले गेले आहेत. तेच काम मला आज पूर्ण करायचं आहे. कारण आपल्या समाजाची दरी वाढली आहे. हिंदूनी मुस्लिमांकडे बोट दाखवयाचं, मुस्लिमांनी हिंदूकडे बोट दाखवायचं ह्या पार्टीने त्या पार्टीला नावं ठेवायची अशाने देशाची प्रगती होणार नाही आणि याचा फायदा बाहेरचे लोक घेत आहेत. म्हणून मला असं वाटतंय की हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण स्वत: दु:खातून जातो तेव्हा मग त्याची जाणीव तीव्र होते.निखिल वागळे : मी करकरे साहेबांना अनेकवेळा भेटलो होतो. माझ्या कार्यक्रमातही ते आले होते. शेवटचं भाषण त्यांनी नवरात्रौत्सवात दिलं होतं. नवरात्रोत्सवातलं त्यांचं भाषण मला आठवतंय. दहशतवाद्यांना धर्म नसतो... असं ते भाषणातून कळकळून सांगत होते. तेव्हा मालेगावचा तपास अगदी वरच्या थराला गेल्या नव्हता. त्या तपासातल्या गोष्टी वादग्रस्त झाल्या नव्हत्या. मला सांगा घरी सुद्धा तुमचं यावर बोलणं व्हायचं? कविता करकरे : यावर आमची चर्चा झालेली आहे. कारण स्वत: सामाजिक बांधिलकीला महत्त्व दिलंच पाहिजे हे मानणारी लोकं आहेत. आम्ही जिज्ञासा प्रकल्पात कामं केलेली आहेत. जेव्हा माझ्या पतीला एक लहान मुलगा ड्रग घेऊन जाताना दिसला तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटलं होतं. यावर काय काम करायला पाहिजे अशी त्यांनी त्यांचे मित्र आनंद नाडकर्णी यांच्याशी चर्चा केली होती. त्यातूनच जिज्ञासा प्रकल्पाचा जन्म झाला. मला असं वाटतं की ते असे एकमेव पोलीस ऑफिसर असतील जे शाळाशाळांतून जाऊन वर्ग घेत होते. ड्रग विरोधात काम केलं पाहिजे असे उद्बोधक वर्ग त्यांनी घेतलेले आहेत. मला असं वाटतंय की हेमंत करकरे निव्वळएक पोलीस ऑफिसर नव्हते त्यांच टोटल जे पोलीस सेवेतलं आयुष्य आहे ते बघितलं तर लक्षात येतं, त्यांनी अनेक ठिकाणी काम केलं आहे. व्हिएन्नामध्ये काम केलं, ठाण्यात काम केलं, नागपूरमध्ये गडचिरोलीमध्ये काम केलं आहे.ते नुसते पोलीस अधिकारी नव्हते. त्यांना असं वाटायचं की पोलीस अधिका-यानं कम्युनिटी सर्व्हिस केली पाहिजे. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही सांगता की ऍण्टी नार्कोटीक्समध्ये असताना त्यांनी पोलीस खात्यातर्फे ऍन्टी ड्रग्ज ही मोहीम राबवली होती. निखिल वागळे : करकरे कसे होते ते फक्त पोलीस अधिकारी नव्हते हे आम्हाला माहीत आहे. ते केमिकल इंजिनिअर होते आणि नंतर आयपीएस होऊन मग ते पोलीस सेवेत आले. त्यांची विचारसरणी काय होती? त्याचं मन कसं होतं ?कविता करकरे : आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा ते हिंदुस्थान लिव्हरमध्ये ते होते. जर ते हिंदुस्थान लिव्हरमध्ये आता असते तर ते एका मल्टी नॅशनल कंपनीचे हेड असते. म्हणजे त्यांचा पगार तर अतिशय मोठा झाला असता. पण समाजाची सेवा करावी असं त्यांना कुठेतरी वाटतं होतं. म्हणून त्यांनी अखिल भारतीय पातळीवरची आयएसएची परीक्षा देऊन ते आयपीएस अधिकारी झाले.निखिल वागळे : तुम्ही आता म्हणालात की ते हिंदुस्थान लिव्हरसारख्या मल्टी नॅशनल कंपनीत होते. जर ते आता त्या सेवेत असते तर त्यांनी लाखो रुपयांचा पगार घेतला असता. ते आयुष्यात मोठे झाले असते. तरीसुद्धा त्यांनी ते टाकून कमी पगाराची पोलीस सेवा स्वीकारली. त्यावेळी तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालं ? ते तुम्हाला त्यावेळी काय सांगत होते? म्हणजे तुमच्यासाठी एवढ्या मोठया मल्टीनॅशनल कंपनीतून नोकरी सोडणं तुमच्यासाठी धक्काच असेल ना?कविता करकरे : त्यांनी नोकरी सोडू नये असं कुठेतरी मला मनात वाटत होतं. पण त्यांनी एकदा निर्णय घेतला तो घेतला. मग मी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यांचं नोकरी सोडणं हा माझ्यासाठी धक्का नव्हता. निखिल वागळे : पण त्यांनी हा निर्णय का म्हणून घेतला ? कशासाठी घेतला ? त्यांनी त्यावेळी तुम्हाला काय सांगितलं होतं ? तुम्हाला त्यांनी कसं विश्वासात घेतलं ?कविता करकरे : आमच्या नेहमीच चर्चा चालायच्या. ज्यावेळी त्यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्टचा कोर्स घेतला होता तेव्हा तोही मी अटेन्ड केला होता. आमचं लव्ह मॅरेज आहे. तेव्हा त्यांचे विचार तर मला नक्कीच ठाऊक होते. निखिल वागळे : तुमचं लव्ह मॅरेज आहे तर ...कविता करकरे : हो. निखिल वागळे : कुठे भेटलात तुम्ही ?कविता करकरे : तिथेच. जेव्हा ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्टचा कोर्स घेत होते. तो मी अटेन्ड केला होता. निखिल वागळे : कुठे ? मुंबईमध्येच..? कविता करकरे : हो. मुंबईमध्येच. त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आमचे विचार जुळतायत. आमचे निर्णय जमतायत. त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेतला. निखिल वागळे : तो कोर्स अजुनही तुमच्या मनात ताजा असेल... मला सांगा, काय सांगायचे ते त्या कोर्समध्ये ?कविता करकरे : अशा कोर्सेसमधून व्यक्तिमत्त्व म्हणजे काय यावरच ते जास्त भर द्यायचे. केवळ बाह्यरुप म्हणजे व्यक्तिमत्त्व नव्हे. आतली सुंदरता म्हणजे व्यक्तिमत्त्व...निखिल वागळे : त्यावेळीही ते पोलिसात होते का ? कविता करकरे : तेव्हा ते पोलीस खात्यात नव्हते. त्यावेळी ते नॅशनल प्रॉडक्टीव्हीटी काऊन्सिलमध्ये होते. तेव्हा ते निरनिराळ्या इंडस्ट्रिज्‌मध्ये जाऊन तिथल्या एक्झिक्युटीव्हज्‌ना ट्रेनिंग देण्याचं काम ते करायचे. निखिल वागळे : त्या कोर्समध्ये ते जे शिकवायचे ते ऐकून, त्या कोर्समधलं त्यांचं प्रेझेन्टेशन पाहून तुम्ही त्यांच्या प्रेमात पडलात ?कविता करकरे : हो. निखिल वागळे : हेमंत करकरे हा माणूस काय होता ? प्रामाणिपणा, निष्ठा, सचोटी हे शब्द त्यांच्यावरूनच ओळखले जातात हे मला माहीत आहे. तुम्ही त्यांचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्टचा कोर्स ऐकणं...मग त्यांनी पोलिसात जाणं...पोलिसांत जाताना त्यांची मन:स्थिती काय होती ? पोलिसात जातोय असं सांगून त्यावेळी त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं ?कविता करकरे : मी समाजाची सेवा करायलाच जातो आहे, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. निखिल वागळे : पण कविताताई मला सांगा पोलीस फोर्सबद्दल अजिबात बरं बोललं जात नाही. तिथे भ्रष्टाचार आहे. तिथे अन्याय होतो. पोलीस नीट काम करत नाहीत. तरीसुद्धा करकरे 20 - 25 वर्षांपूर्वी पोलीस खात्यात गेले. त्यांची जिद्द काय होती ?कविता करकरे : पोलीस खात्यात काही भ्रष्टाचार असेल किंवा अन्य कोणत्या त्रुटी असतील... त्यांच्या मात्र मला नेहमीच एक पॉझिटीव्ह टीट्युड दिसला. त्यांनी मला त्यांच्या वरिष्ठांबद्दल कधीही निगेटीव्ह सांगितलं नव्हतं. कधी मित्रांबद्दल निगेटीव्ह बोलल्याचं आढळून आलं नाही. आमच्या कुठल्याच नातेवाईकांबद्दल त्यांनी नकारात्मक सूर काढला नव्हता. एक अतिशय पॉझिटीव्ह ऍटीट्युड मला त्यांच्यात दिसला. निखिल वागळे : काय म्हणायचे ते... तुमच्या काही आठवणी असतील ना ? तुम्हाला पोलीस दलाबद्दल काय सांगायचे ते ?कविता करकरे : खरं सांगू का... आम्ही घरी पोलीस दलाबद्दल खूप चर्चा करायचो नाही.निखिल वागळे : पोलीस दलाच्या व्हॅल्यूज्‌बद्दल तरी....कविता करकरे : नाही. कारण मला त्या व्हॅल्यूज् त्यांच्या वागण्यातूनच दिसायच्यात. त्यांच्या व्हॅल्यूज् काय आहेत ते मला समजलं होतं. निखिल वागळे : म्हणजे ते काय वागयचे ? मी हे तुम्हाला अशासाठी विचारतोय की आज सगळीकडे हेमंत करकरेंच्या श्रद्धांजली सभा घेतल्या जात आहेत. शहिदांना सलाम म्हटला जात आहे. पण बेसिक ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, सचोटी, जे गुण आपल्या समाजात दुर्मिळ झाले आहेत ते हेमंत करकरेंमध्ये होते. करकरें बद्दलचं हे सगळं तरुणांना समजायला हवं. तेव्हा तुम्ही हे सांगायला हवं की कशाप्रकारच्या व्हॅल्यूज् भाषण न देता त्यांच्यामध्ये होत्या ? कविता करकरे : त्यांची राहणी साधी होती. त्यांच्या गरजा खूप कमी होत्या. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या ' भ्र 'लाही त्यांच्या आयुष्यात थारा नव्हता. त्यांची खाण्यापिण्याची आवडही अतिशय साधी होती. सात्विक पद्धतीचा आहार ते जेवायचे. खूप कपड्यांचाही त्यांना सोस नव्हता. अशा साध्या राहणीमानामुळे त्यांचं मन कधी भ्रष्टाचाराकडं वळलंच नाही. शिवाय करकरेंच्या घरीही वेगळी आयडीओलॉजी होती. त्यांचे वडील स्ट्राँग कम् युनिस्ट होते. ते संस्कार करकरेंवर झाले आहेत.निखिल वागळे : करकरेंनी गेली दोन दशकं पोलीस दलात वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे. तो अनुभव काय होता... उदा. ते नागपूरमध्ये होते, ते गडचिरोलीत होते... हा काय अनुभव होता... कविता करकरे : गडचिरोलीत असताना नक्क्षलाईट्स मुव्हेंमेंट व्हायच्या. त्यांच्यासारख्या एवढ्या सिनिअर ऑफिसरला जायची काही गरज नसायची. पण ते ऑपरेशन्समध्ये स्वत:च जायचे. हा त्यांचा गुण मला पहिल्यापासूनच भावला होता. निखिल वागळे : म्हणजे आत्ताच्या दहशतवादी हल्ल्यातही ते स्वत:हून गेले होते. अंतुलेंनी हा प्रश्न विचारला होता की हे तीन ऑफिसर एकत्र कसे गेले ? या प्रश्नानं तुमच्या मनाला खूप वेदना झाल्या असतील, हे मला ठाऊक आहे ? आता तुम्ही गडचिरोलीचंही उदाहरण दिलंत... असं ते का कारायचे ?कविता करकरे : कारण त्यांनी कर्म मार्गाला जास्त महत्त्व दिलं आहे. गीतेत जो कर्ममार्ग सांगितला आहे त्यालाच करकरेंनी सर्वात जास्त जवळचं मानलं आहे. निखिल वागळे : त्यांनी गीता वाचलेली आहे ?कविता करकरे : हो. त्यांचा गीतेचा अभ्यास झाला आहे. आणि त्यांच्या घरची मी आयडॉलॉजी सांगते... त्यांची आई बीजेपीच्या विचारसरणीची होती आणि वडील कम्युनिस्ट होते. बीजेपीमध्येे आणि कम्युनिझममध्ये जेजे म्हणून काही चांगलं आहे त्या दोन्हीचा परिपाक माल हेमंत करकरेंच्या व्यक्तिमत्त्वात जाणवला आहे. कारण प्रत्सेक पार्टीतून निश्चित काही ना काही घेण्यासारखं आहे. ते आपण घेतलं पाहिजे. एका पार्टीनं दुस-या पार्टीला नावं ठेवणं, दुस-या पार्टीनं तिस-या पार्टीला नावं ठेवणं यानं देशाचा विकास काही होत नाही. पण जर त्या दोन्हा पार्टीचा जर समन्वय झाला तरच आपण देशाची उन्नती होते. म्हणजे त्यांच्या आई-वडिलांची वेगवेगळी आयडीओलॉजी असली तरी त्या दोघांमध्ये मला कधी भांडणं होताना दिसली नाहीत. आणि याचे अतिशय चांगले परिणाम मला त्यांच्या चारही भावंडात झालेले दिसून येतात. ती चारही भावंडं अतिशय साधी आहेत. भ्रष्टाचाराकडे मला या भावंडांपैकी कुणाचाच कल दिसून येत नाही. निखिल वागळे : तुम्ही म्हणालात की वडील कम्युनिस्ट होते आणि आई बीजेपीच्या विचारसरणीची होती ? हे खूप वेगळं आहे ? असं क्वचित्‌च असतं ? नवरा ज्या विचारसरणीचा असतो... त्या विचारसरणीच्या पाठोपाठ जाणारी बायको असते, असं पुरुषप्रधान समाजातलं सर्वसाधारण चित्र असतं ? तुम्हा जेव्हा या घरात आलात तेव्हा अशा काही चर्चा व्हायच्या का ?कविता करकरे : घरातल्या स्त्रीला खूप मान दिला जातो, हे मला या घरात जाणवलं. म्हणजे माझ्या सासुबाई लग्नानंतर एम.ए. एम. एड् झालेल्या आहेत. त्या प्राध्यापक होत्या. तेवढा मान माझ्या घरामध्ये स्त्रियांना मिळायचा नाही. कारण तो काळच वेगळा होता. स्त्रियांना जास्त स्वातंत्र्यच नव्हतं. पण इथे तसं दिसत नव्हतं. सासुबाईंना पूर्णपणे स्वातंत्र्य होतं. इथे आम्हाला नेहमीच शिक्षणाची संधी दिली गेली होती. त्यामुळे माझी धाकटी जाऊसुद्धा लोकसत्तेत जर्नलिस्ट आहे. तिनंसुद्धा लग्नानंतर तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. निखिल वागळे : म्हणजे तुम्ही अशा घरात आलात की जिथले संस्कारित ज्या घरामध्ये एक वेगळाच संस्कार होता जो हेमंत करकरेंवर झालाये. मगाशी आपण हेमंत करकरेंच्या वैचारिक , मानसिक घडणीवर बोलत होतो. मला अजूनही त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आपल्या नोकरीत कमिटमेन्ट नं, बांधिलकीनं लोकांची सेवा करायची आहे, हा संस्कार त्यांच्यावर जो झाला आहे, तो त्यांच्यावर इथेच बिंबवला गेलाय का ?कविता करकरे : हो निश्चितच. त्यांच्यावर हा संस्कार त्यांच्या आई-वडिलांकडूनच झालेला आहे. कारण संस्कार हे लहानपणीच होतात. 20-22 वर्षांच्या मुलांवर आपण जर संस्कार करायचे म्हटलेत तर ते अजिबात होणार नाहीत. याचा सगळ्या आई-वडिलांनी विचार करायला हवा. मुलांवर सगळे संस्कार हे लहानपणापासूनच केले गेले पाहिजेत हे प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य आहे. अगदी सर्वधर्मसमभावाचाही. कारण 22-23 वर्षांनंतर हिंदू-मुसलमान एकत्र येतात. त्यावेळी त्यांच्यात त्यांच्या त्यांच्या धर्माबद्दल इतकी तेढ, द्वेष निर्माण झालेला असतो. तर असं होऊ नये याकरिता शाळे पासूनच मुलांना सर्वधर्मसमभावाचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. शाळेत त्या विषयावर एक तासच घेतला गेला पाहिजे. या तासाला निरनिराळ्या धर्मांच्या प्रार्थना म्हणणं, निरनिराळ्या धर्माबद्दल गोष्टी सांगणं, निरनिराळ्या धर्मातल्या माहितगारांना बोलावणं, त्यावर चर्चा करणं, निबंधस्पर्धा आयोजित करणं, विविध सण साजरे करणं त्याने धर्माधर्मातली तेढ नष्ट व्हायला मदत होईल. आपण उगाचच कम् युनल हार्मोनिच्या नावाखाली निरनिराळ्या सभा बोलावतो. त्यांच्यात गाणी म्हणतो. 25, 50 वर्षांच्या माणसांना बोलावतो. त्यांनं धर्मातली तेढ निर्माण कमी होण्यासाठी काहीच प्रयत्न होत नाही. त्यामुळे सर्वधर्मसमभावाचे संस्कार मुलांवर त्यांच्या लहानपणी केले गेले पाहिजेत. करकरेंना अशा संस्काराचं बाळकडू त्यांच्या लहानपणीच पाजलं गेलं होतं.मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास लावणं हे खूप कठीण काम होतं. दुसरा कोणी ऑफिसर असला असता तर निश्चितच या प्रकरणात डोळेझाक झाली असती. आम्हाला ब-याच लोकांकडून विरोध झाला. आमच्या नातेवाईकांकडूनही विरोध झाला. अरे काय करतो हेमंत दादा, काय कर रहा हैं हेमंत...असंही अनेक जणांनी म्हटलं आहे . पण माझे पती कोणत्याही कामाला न्याय देणार आहेत, याची मला पूर्ण कल्पना होती. म्हणूनच तर ते डगमगले नाही. निखिल वागळे : मालेगाव बॉम्बस्फोटाचा जेव्हा प्रसार चालला होता तेव्हा हेमंत करकरे खूप अस्वस्थ होते. ते रिबरोंना जाऊन भेटले. ते अरविंद इनामदारांनाही जाऊ न भेटले होते. त्यांनी त्यांची अस्वस्थता त्यांच्या मित्रांकडेही व्यक्त केली होती. माझ्यावर दबाव येतोय हे त्यांनी त्यांच्या मित्रांकडेही बोलून दाखवलं आहे. तर तुम्हाला हे जाणवलं होतं का ? त्यांना तुमच्याशी हे शेअर केलं होतं का ?कविता करकरे : त्यांनी घरामध्ये तसं काही सांगितलंच नव्हतं. ते घर आणि काम वेगवेगळं ठेवायचे. घरामध्ये कधी ते कामाचं सांगायचे नाहीत. आमच्या घरात जे काही डेकोरेशन आढळतं, ज्या काही कलाकृती आढळतात ते त्यांनी केलेलं आहे. त्यांना डेकोरेशन करण्याचा, कलाकृती बनवण्याची आवड होती आणि त्याच्यातच ते घरी असताना रमायचे. ते काष्ठशिल्प, वुडन कार्व्हिंगही करायचे. निखिल वागळे : मालेगाव बॉम्बस्फोटाचा जो त्यांनी तपास केला होता, त्यावेळी ते जरी घरी काही बोलत नसले तरी त्यांची मन:स्थिती कशी होती ? तुम्हाला काय जाणवलं होतं ? तुम्ही त्यांचं घर चालवलं आहे ? कुटुंब चालवलं आहे ?कविता करकरे : ते टेन्शन कधीच घरी आणत नव्हते. मी ब-याचदा पाहिलं आहे की बरेच पुरुष त्यांचं टेन्शन घरी आणतात, चीडचीड करतात पण करकरेंच्या बाबतीत तसं झालं नाही. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करताना त्यांनी तिथलं टेन्शन कधीच घरी आणलं नाही. त्यांनी शेअर केलं असतं तर बरं झालं असतं, असं आता वाटायला लागलं आहे. पण त्यांनी नाही केलं शेअर. निखिल वागळे : त्यावेळी करकरे साहेबांबद्दल वर्तमानपत्रांमधून वाईट साईट छापून आलं होतं. एटीएसच्या अधिका-याची धिंड काढावी असंही लिहून आलं होतं. इतका ऑनेस्ट ऑफिसर... पूर्ण त्यांची करिअर तुम्ही पाहिली आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. इतका दबाव त्यांच्यावर याआधी कधीही नव्हता. राजकीय दबाव होता. हा तपास करू नये म्हणूनही दबाव होता. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता ? कविता करकरे : तेव्हा त्रास निश्चित झाला. आम्हाला मित्रांकडून , कुटुंबियांकडूनही ऐकायला मिळालं. कशाला करतोय हेमंत तपास... सोडून द्यावं ना त्यानं हे सगळं... असं स्किन सेव्हिंग अशी जी प्रवृत्ती असते तसं वागावं असा सल्ला मिळाला. पण मला माहीत होतं की ते जे काम करत आहेत ते योग्य आहे आणि ते त्यांनी केलंच पाहिजे. शेवटी काय आहे आपल्यातलं आत्मतत्त्व जागृत ठेवलं पाहिजे. त्यालाच जर मारलं तर माणूस जगणार तरी कसा? आणि त्याच्याकडे ते डोळेझाक करणार नाहीत हे मला माहीत होतं आणि ते योग्यच करत होते यावर मात्र माझा पूर्ण विश्वास होता. निखिल वागळे : मला सांगा... अतिरेक्यांना धर्म नसतो, असं ते नेहमीच म्हणायचे. त्यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणातूनही अतिरेक्यांना धर्म नसतो, असंच सांगितलं आहे. ते त्यांनी तपासातून दाखवून दिलं ?कविता करकरे : निश्चितच दाखवून दिलं. कारण अनेक वर्षांपासून आपण म्हणतो की मुस्लिम दहशतवादी , मुस्लिम दहशवादी... अशावेळी अनेक मुस्लिमांना काय वेदना होत असतील हे अनेक हिंदुवाद्यांना समजलेलं आहे आणि जेव्हा हिंदू दहशतवादी ही संकल्पना आली किंवा हिंदू दहशतवादी म्हटला गेला तेव्हा त्यांना ते दु:ख झालं. त्यामुळे अतिरेक्यांना धर्म नसतो. आपण कधीही असं म्हणू नये शीख दहशतवाद किंवा मुस्लिम दहशतवाद, हिंदू दहशतवाद... कारण दहशतवाद ही प्रवृत्ती आहे. ती कुप्रवृत्ती आहे. प्रत्येक माणसामध्ये असते. चांगली प्रवृत्ती आणि कुप्रवृत्ती असते. तर ती चांगली प्रवृत्ती कशी जोपासायला पाहिजे, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा कुप्रवृत्ती बाहेर येते तेव्हा त्याला दहशतवाद म्हटला जातो. त्यामुळे निश्चितच दहशतवाद्याला धर्म नसतो. निखिल वागळे : दहशतवाद्याला धर्म नसतो हे तर निश्चितच करकरेंनी त्यांच्या तपासातून दाखवून दिलं. त्याकाळामध्ये... तुम्ही असं म्हणालत की... त्यांची आई बीजेपीची होती. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनीसुद्धा त्यांचा निषेध केला. त्यांच्या विरोधात निदर्शनं केलीत. तुमचे नातेवाईक अजूनही संघपरिवाराशी संबधीत असतील... त्यांच्याकडूनही दबाव आला ? कविता करकरे : नाही थोडंसं असं आलं होतं. ' काय करतोय हेमंत ? त्यानं असं करायला नको ' वगैरेसारख्या शंका उपस्थित झाल्या होत्या. निखिल वागळे : पण मग असे बीजेपीचे नेते ऍपरोच होऊन सांगत असतील की कशाला करताय तुम्ही असं वगैरे...सांगतही असतील... कविता करकरे : ते मला काही कळलं नाही. नेते ऍपरोच झालेत की नाही हे मला काही कळलं नाही. कारण जास्त करून ते बाहेरच्या गोष्टींची घरात चर्चा करायचे नाहीत. त्यामुळे मीही त्यांना त्याविषयी तसं कधीच डिर्स्टब करत नव्हते. कारण त्यांच्या कामावर माझा विश्वास होता. त्यांचं काम मला माहीतही होतं. निखिल वागळे : तुम्हाला माहीत होतं की हा जो तपास चालला आहे त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचं वैयक्तिक मत आणणार नाहीत ?कविता करकरे : हो. हे निश्चितच ठाऊक होतं मला. निखिल वागळे : पण मला सांगा ते अस्वस्थ होते, हे तर सगळ्यांनाच माहितीये . अनेक पोलीस ऑफिसर्सना माहितीयेय... तो तपास चाललेला असतानाच हा दहशतवादी हल्ला झाला आणि ते गेले. तुम्ही म्हणलात की गडचिरोलीलाही ते फ्रन्टवर जाऊन लढत होते. आता दहशतवादी हल्ल्यावर जाताना त्यांनी जॅकेटस् घातलं...त्या सगळ्या इमेजेस आपल्या डोळ्यांसमोर आहेत. त्यांनी हेल्मेट घातलं आणि ते गेले. तुम्हाला असं वाटतं की खूप दबावाखाली होते ते त्याकाळामध्ये आणि एकदम लढाईच्या मैदानात ते उतरले. असं कुठेतरी तुम्हाला वाटतंय की ते झालं नसतं तर बरं झालं असतं ?कविता करकरे : आता एक पत्नी म्हणून मला असं वाटतंय की ते झालं नसतं तर बरं झालं असतं. निखिल वागळे : पण मग काय म्हणजे ?कविता करकरे : त्याला आता ब-याच लोकांची कारणं आहेत. ते हेल्मेट घालत असताना मला शेवटी दिसले. त्यांच्या मृत्यूनंतर तर आम्ही एक महिना पूर्णपणे दु:खात बुडून गेलो होतो. पण नंतर विचार केला की त्यांना दिलेलं हेल्मेट बरोबर होतं का ? ते हेल्मेट कसं आहे कुणी पहायचं ? त्यांनी जॅकेट घातलं होतं ते कितपत चांगलं होतं ? ते कितपत प्रभावी होतं ? किंवा गाडी त्यादिवशी फेल्युर झाली होती. यांच्या सिक्युरिटीची व्यवस्था कोणी पहायची ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले आणि ते निरुत्तरीतच राहिले. निखिल वागळे : मला सांगा करकरे यांच्यासारखे जे प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत, त्यांची काळजी आपण नीट करत नाही असं तुम्हाला वाटतं ?कविता करकरे : निश्चितच वाटतं. निखिल वागळे : जी त्यांची काळजी घेतली पाहिजे किंवा जे त्यांना पुरवलं पाहिजे ते पुरवत नाहीत... ?कविता करकरे : आपला समाज यात कमीच पडत आहे. निखिल वागळे : हे तुम्ही जे बोलतायत की अधिका-यांची काळजी आपला समाज घेत नाहीये... हीच भावना तुम्ही काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलून दाखवली होती आणि ती कवितेतून आली होती. तुम्ही नेहमी कविता करता का ? कविता करकरे : हो. कारण माझं नाव आधी ज्योत्स्ना होतं. पण माझ्या मिस्टरांनीच माझं नावं कविता ठेवलं आहे. कारण मला कविता करण्याची आवड आहे. निखिल वागळे : ती काय कविता तुम्ही केलीत... तुमची भावना तुम्ही कशी व्यक्त केलीत ? कविता करकरे : ती वाचून दाखवू का ?निखिल वागळे : हो वाचून दाखवा...कविता करकरे : मेरे पती शहीद होने का मुझे गम जरूर हैं, अफसोस नही. शहीद की पत्नी सफेद साडी पेहनती नही, अपना सिंदुर मिटाती नहीअपनी चुडियाँ निकालती नही...वैदिक काल में जिनके पती रणभूमीसे लौटकर आते थे उनकी औरते उनके नाम का सिंदुर लगाने के लिये मना करती थी मेरे पती शहीद होने का मुझे गम जरूर हैं, अफसोस नही. फिर भी कुछ सवाल मनमें आते हैं जवाब मिल नही पातेमैने अपने पती को हेल्मेट पेहनते हुये देखा था... वो हेल्मेट क्यु आता नही इसका कुछ जवाब था बुलेटप्रुफ जॅकेट सिर्फ एक दिखावा था बुलेट प्रुफ गाडियाँ प्रदर्शन का एक अनोखा दृश्य थालेकिन अपने डिपार्टमेन्टमें डिझास्टर मॅनेजमेंट की दयनीय अवस्था क्युँ है ?मन करता है पागल तू किसे सवाल करता है ? ये तीनोही आगे क्युँ गये, सवाल बार बार आता हैकर्तव्य के आगे उनके रफ्तार को कौन जानता है ? लेकिन बाकी सब कहाँ थे ? जवाब मिलना नामुकीन हैसमाज कहता है की आपके पती के धाडस का, आप बेवा होना जवाब हैकुछ कुछ लोग ऐसा भी बोलते है की उनको हिरोगीरी करनी थी, इसलिये आप बेवा हुईमगर मैं मानती हूँ की अपने पती के कर्तव्यतत्परताका मैं साक्षात सती का रुप हुँअब मेरे बहनोंसे मेरी कोई शिकायत नही. क्युँकी वो नही रहे तो शिकायत का मौका कहा हैपर आगे चलनेवालोंको ये बदलाव जरुरी है. नही तो हमेश ऐसी बोहोतसी औरते बेवाही होती रहेगी... इसिलिये सबी अधिकारीयोंकी ड्युटी को परिभाषित करना जरूरी हैं और किसीने जिम्मेदारी भी लेना जरुरी है मेरे पती शहीद होने का मुझे गम जरूर हैं, अफसोस नही. अग्रेजोंके छेद और भेद राजने भारत मैं द्वेष का बीज बोयाउसमें खातपानी डालकर हमनें इम्तकाल की आग मैं बडा किया बाबरी मस्जिद गिरानेका यही तो एक जवाब है1993 बॉम्ब ब्लास्ट इसिका तो एक तमाशा हैसाबरमती एक्स्प्रेस का जलाना पाकिस्तान की एक चाल थी इसलिये हमारे नासमजीका प्रतिक गोध्रा हत्याकांड है2006 का रेल बॉम्बब्लास्ट उसका तो एक उदाहरण है क्युँ रुक गयी अफजल गुरू की फाँसी ? यह हर भारतवासी का जवाब हैंइस सवाल का जवाब रुकता नही, यह तो हर आतंक दर्दभरी दास्ताँ हैं भगतसिंग, राजगुरू शहीद हुये तब अंग्रेजोंकी राजनिती थीकरकरे, कामटे, सालसकर शहीद हुये लेकीन अब तो भारतमाता राजनीती हैमेरे पती शहीद होने का मुझे गम जरूर हैं, अफसोस नही. मालेगाव बॉम्बब्लास्ट की मेरे पतीने जाँच पुरी की सारा देश टुट जानेपर यह शहिदोंने बचाया हैं दुनियाके सामने एक आदर्श मिसाल रखी हैं यही उनकी ज्योत देशभक्ती की अमर अमीट निशानी हैं...निखिल वागळे : कविताताई तुम्ही या कवितेतून खूप काही सांगून गेला आहात आणि तुम्ही जे म्हणतायत की माझ्या मनात ' गम ' आहे पण ' अफसोस ' नाही. हे बरोबर आहे. म्हणूनच तुम्ही इतक्या धीरानं पुन्हा उभ्या राहिल्या आहात... मला तुम्हाला पुन्हा विषयाकडे आणायचं आहे. या कवितेतून तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत... असं दिसतंय की पोलीस खात्याबाबत एकूणच सगळ्या सिस्टिमवर तुम्ही खूप नाराज आहात. काय नाराजी आहे तुमची ? कविता करकरे : मी पोलीस डिपार्टमेटबद्दल नाराज नाहीये तर एकूणच सगळ्या सिस्टिमबद्दलची माझी ही नाराजी आहे. एकूणच सिस्टीम आपल्याला सुधारायला हवी. कारण आपण जेव्हा म्हणतो की हा दहशतवादी आहे तो चुकीचा आहे, असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यानं बंदूक का धरली ? त्यानं ती विचारसरणी का स्वीकारली ? याचा आपण विचार करायला पाहिजे. कारण ती जर विचारसरणी त्यानं का स्वीकारली हे आपल्याला जर कळलं तर आपण त्या माणसाला दोषी धरणार नाही. एकदा माझ्या मिस्टरांना म्हटलं होतं की, हेमंत करकरे म्हणजे ऍन्टी टेररिस्ट स्क्वॉडचे प्रमुख आहेत. पण ते त्यावेळी म्हणाले होते की मी ऍन्टी टेररिस्ट स्क्वॉडचा प्रमुख नाहीये तर मी ऍन्टी टेररिझम स्क्वॉडचा प्रमुख आहे. दहशतवादाची विचारसरणीच मला मान्य नाहीये. मी माणसालाच निश्चितच समजून घेतो. त्यामुळे माणूस ती बंदूक का उचलतो, याचा विचार आपण करायला हवा. जसा आपल्या समाजामध्ये भ्रष्टाचार फोफावला आहे, नेते मंडळी काही लोकांना पाठीशी घालत आहेत. तर हा भ्रष्टाचार का घडतो, याचा विचार आपण करायला पाहिजे. भ्रष्टाचारी माणसाला नावं ठेवणं माझ्या व्यक्तिमत्त्वात बसत नाही. आधी हा भ्रष्टाचार घडतो का, हे आपण समजून घेतलं पाहिजे. निखिल वागळे : करकरे जे हल्मेट घालत होते, जॅकेट घालत होते ते पुरेसं नाहीये हे कुठेतरी तुमच्या मनात आहे. आणि ती भावना तुमच्या कवितेतूनही समोर आली आहे. हे तिघंच का गेले हा प्रश्नही तुम्हाला लागलेला आहे. तुम्हाला खूप लोकांनी टोकलंय का त्यावरून ? धाडसी ऑफिसर जाणारच ना ?कविता करकरे : पण वर्तमानपत्रातून तसं छापून आलं आहे. लोकांचंही तसं बोलून झालं आहे.