#भाषण

Showing of 14 - 27 from 238 results
VIDEO: काँग्रेसला हटवा तेव्हाच देशाचा विकास शक्य; मोदींचं UNCUT भाषण

महाराष्ट्रApr 12, 2019

VIDEO: काँग्रेसला हटवा तेव्हाच देशाचा विकास शक्य; मोदींचं UNCUT भाषण

अहमदनगर, 12 एप्रिल : ''या निवडणुकीत काँग्रेसचा पूर्णतः सुपडा साफ केला तरच देशाचा विकास शक्य आहे'',असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर येथे पार पडलेल्या प्रचार सभेत म्हणाले. भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे पाटीय यांच्या जाहीर प्रचार करण्यासाठी नगरमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ''काश्मीर देशापासून तोडणाऱ्यांना काँग्रेस समर्थन देत आहे, त्यामुळे देशात अस्थिरतेचं वातावरण आहे. शरद पवारांनी यापूर्वी देशासाठीच काँग्रेस सोडली होती, मग आता त्यांना शांत झोप तरी कशी येते'', असा प्रश्न उपस्थित करत ''देशाला प्रामाणिक चौकीदार हवे असतील तर भ्रष्टाचाऱ्यांचा समुळ उखडून फेकावं लागेल'',असं मोदी म्हणाले. ''पुन्हा सरकार आल्यावर शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करणार. तसंच पीएम किसान योजनेचा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना देणार आणि पिकाला हमीभावही देणार'', असं मोदींनी या जाहीर सभेत सांगितलं.

Live TV

News18 Lokmat
close