#भाषण

Showing of 235 - 248 from 248 results
राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

बातम्याSep 3, 2012

राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

03 सप्टेंबरबिहारी विरुद्ध मनसे हा वाद आता चांगलाच पेटत चाललाय. बिहारींच्या विरोधात राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर उत्तर भारतीय नेत्यांनी त्यांच्यावर एकच हल्लाबोल केला. पण राज ठाकरेंनी आज पुन्हा उत्तर भारतीयांना प्रत्युत्तर दिलंय. गुन्हेगार उत्तर भारतातच का जातात राज ठाकरेंचा सवाल करत त्यांनी उत्तर भारतीय नेत्यांवर टीका केली. त्याचबरोबर बिहारच्या मुख्य सचिवांच्या पत्राबद्दल आर.आर.पाटील म्हणतात मला माहिती जर खात्याचा कारभार कळत नसलं तर राजीनामा द्यावा अशी मागणी पुन्हा केली. तसेच हिंदी चॅनेल्सवाले आपल्या विधानाचा विपर्यास करत आहे जर हे थांबवले नाही तर महाराष्ट्रात चॅनेल्स चालू देणार नाही असा इशाराच देऊन टाकला. मुंबईतील रविद्र नाट्यमंदिरात मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

Live TV

News18 Lokmat
close