#भाषण

Showing of 989 - 1002 from 1006 results
युतीबाबत आठ दिवसात निर्णय - मनोहर जोशी

बातम्याFeb 26, 2009

युतीबाबत आठ दिवसात निर्णय - मनोहर जोशी

26 फेब्रुवारी, मुंबईविनोद तळेकर शिवसेना भाजप युतीचा निर्णय आठवडाभरात होईल अशी माहिती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे. पण शिवसेनेबरोबर सर्व पर्याय खुले असल्याचा इशाराही त्यांनी दिला.शिवसैनिकांच्या नेते आणि पदाधिका-यांचा मेळावा वांद्र्याच्या रंगशारदामध्ये सुरू आहे. या मेळाव्यात शिवसेना-भाजपा युतीबाबत सर्व पदाधिका-यांची मत जाणून घेतली जात आहेत. यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भाजप-शिवसेना युती होणार की नाही त्याबाबत ते काही थेट बोलले नाहीत. पण भाजप शिवसेना युतीबाबत त्यांनी थेट उत्तरं दिली नाही. त्यामुळे शिवसेना - भाजप युती होईल की नाही याबाबत संदिग्ध उत्तर देत उत्सुकता कायम ठेवली आहे. पत्रकार परिषेद मनोहर जोशींना राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या युती बद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी मनोहर जोशींनी त्या प्रश्नाला सोयीस्कररीत्या बगल देत सध्यातरी आमची युती भाजपशीचीच आहे, असं मनोहर जोशी म्हणाले. त्यावेळी आमच्यासाठी कोणतेही पर्याय बंद नाहीत, ' अशी सूचक प्रतिक्रियाही मनोहर जोशींनी दिली.मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत वादावादीही झाली. शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी लांबलचक भाषण केलं.त्यामुळं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. कुठं थांबायचं तेही कळत नाही असा शेरा मनोहर जोशींनी मारला. त्यावर शिवसेनेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी जोशींना नाव न घेता चिमटे काढले. मोहन रावले पाच वेळा निवडून आले. ते चांगलं बोलतात. अनेकदा चांगलं बोलणारे निवडून येत नाहीत असा टोमणा कदम यांनी जोशींना नाव न घेता मारला. शिवसेनेच्या या बैठकीवर भाजप नेते एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली. ते सांगतात, " शिवसेना आणि भाजप हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत. दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र सभा होता. शिवसनेच्या सभेत भाजपचं आणि भाजपच्या सभेत शिवसेनेचं नाव घेतलं गेलंच पाहिजे, असा काहीही आग्रह नाही.जेव्हा दोन्ही पक्ष एकत्र येतात, तेव्हा एकमेकांबद्दल बोलतोच की. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांविषयी बोलायचं झालं तर ते बोलतात एक आणि करतात दुसरं. त्यामुळे त्यांच्याबाबत कधी काय बोलावं हेच कळत नाही. परिणामी पवारांच्या बोलण्यावर किती आणि केवढा विश्वास ठेवावा हे ज्याचं त्यांनं ठरवावं. "आपापल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेचे भाजपवर आणि राष्ट्रवादीचं काँग्रेसवर दबावतंत्र वाढत आहे. लोकांना असं वाटतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होईल. पण नेमकं चित्र काय आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. एकंदरीत आगामी निवडणुका पाहता जागा वाटपांवरून सगळी मारामारी चालली आहे. पण हे फार कमी काळापर्यंतच असेल, अशी शक्यता निवडणूकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close