#भारीप नेते

SPECIAL REPORT : बुलडाण्यात 'वंचित फॅक्टर' जाणार फेल, भाजप होईल का फायदा?

व्हिडिओMay 9, 2019

SPECIAL REPORT : बुलडाण्यात 'वंचित फॅक्टर' जाणार फेल, भाजप होईल का फायदा?

अमोल गावंडे, बुलडाणा, 09 मे : भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांचा गड असलेल्या अकोल्यानंतर त्यांना मानणारा मोठा वर्ग कुठे असेल तर तो बुलडाण्यात. खामगाव, जळगाव जामोद, हा भाग अकोला जिल्ह्याला लागून असल्यानं तिथं भारिपची ताकद आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी कुणाचं गणित असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कार उमेदवारी दिल्यानं वंचितचे जिल्ह्यातले नेते नाराज झाले. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे डॉ राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव या तगड्या उमेदवारांचं आव्हान आहे. त्यातच बुलडाण्यात प्रचाराचं तगडं नियोजन झालं नसल्यानं वंचित फॅक्टर इथं किती प्रभावी ठरतो, याबद्दल शंका आहे.

Live TV

News18 Lokmat
close