#भारत

Showing of 5136 - 5149 from 5443 results
सानियाच्या लग्नात आयेशाचे विघ्न

बातम्याApr 2, 2010

सानियाच्या लग्नात आयेशाचे विघ्न

2 एप्रिलटेनिसपटू सानियाच्या लग्नाच्या मार्गात अनेक विघ्ने येत आहेत. सानियाचे ज्या पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न होणार आहे, त्याचे आधीच लग्न झाल्याच्या बातम्या मीडियातून येत होत्या. हैदराबादच्या आयेशा सिद्दीकीशी त्याचे लग्न झाल्याचा दावा आता आयेशाच्या वडिलांनी केला आहे. त्या निकाहनाम्याची कागदपत्रेही आयेशाच्या वडिलांनी सादर केली आहेत. त्यामुळे आता दुसर्‍या लग्नाआधी शोएबने आयेशाला तलाक द्यावा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा इशाराच तिच्या वडिलांनी दिला आहे. पण आयेशाच्या वडिलांचा हा दावा खोटा असल्याचे शोएबचे म्हणणे आहे. शोएब त्यांच्याविरोधात खटलाही दाखल करणार आहे.आयेशाने तिच्या घरी झालेल्या एका पार्टीची व्हिज्युअल्सही सादर केली आहेत. ही व्हिज्युअल्स आयेशाच्या हैदराबादच्या घरी झालेल्या पार्टीची आहेत. यात शोएबसह इतरही पाकिस्तानी क्रिकेटर्स सहभागी झाले होते. 2005च्या पाकिस्तानी टीमच्या भारत दौर्‍यादरम्यानची ही घटना आहे. निकाहनाम्यासोबतच ही व्हिज्युअल्ससुद्धा आयेशा आणि शोएबचे लग्न झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा आहे, असे आयेशाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याआधी शोएब मलिकनेही हैदराबादमधील एका मुलीशी लग्न केल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता.