News18 Lokmat

#भारत

Showing of 4512 - 4525 from 5113 results
अबू सालेम भारतातच राहणार

बातम्याMar 19, 2012

अबू सालेम भारतातच राहणार

19 मार्चअबू सालेमचे प्रत्यार्पण रद्द करण्यास पोर्तुगाल कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टात अबू सालेमविरोधातील आरोपपत्रात फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेलं कलम लावण्यात आलंय. हे प्रत्यार्पण कराराचं उल्लंघन आहे अशा आशयाची याचिका पोर्तुगाल कोर्टात दाखल करण्यात आली होती. प्रत्यार्पणाच्या वेळेस भारत सरकारने पोर्तुगाल सरकारला आश्वासन दिलं होतं. यात अबु सालेमविरोधात फाशीची शिक्षा किंवा 25 वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असलेली कलम लावली जाणार नाहीत या अटींचा समावेश होता. पण मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी सालेमच्या विरोधात अशी कलम लावली आहेत. ती कमी करावी अशी अबू सालेमची विनंती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर लिस्बन इथल्या हायकोर्टात अबू सालेमनं दाद मागितली होती. लिस्बन हायकोर्टाने भारतावर प्रत्यार्पण कराराचे उल्लघन झाल्याचा ठपकाही ठेवला होता. पण आता पोर्तुगालमधल्या वरच्या कोर्टाने अबू सालेमचे प्रत्यार्पण रद्द करण्यासच स्थगिती दिली आहे. सीबीआयच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आज ही माहिती दिली.