#भारतीय

Showing of 8503 - 8516 from 8705 results
सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत टॉप टेनमध्ये

बातम्याDec 5, 2008

सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत टॉप टेनमध्ये

5 डिसेंबर हैद्राबादप्रिती सिंगबॅडमिंटनमधून खूशखबर आहे. सायना नेहवालनं बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत 10वं स्थान पटकावलंय. जागतिक बॅडमिंटनमध्ये आजवर कुठल्याही भारतीय बॅडमिंटनपटूला अशी कामगिरी करता आली नव्हती. 18 वर्षीय सायना नेहवालला 2008 हे वर्ष स्वप्नवत ठरलं. बीजिंगमध्ये तिनं क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली आणि तिथेच सगळं चित्र बदललं. त्यानंतर तिनं मागे वळून बघितलंच नाही. सानियालाही तिनं मागे टाकलं. चायनीज तैपेई ओपनमध्ये विजेतेपद पटकावलं आणि मग कॉमनवेल्थ युथ गेम्स आणि वर्ल्ड ज्युनियर्स या दोन स्पर्धा लागोपाठ जिंकल्या.पण राष्ट्रीय कोच गोपीचंद यांचं म्हणणं आहे की तिचा सर्वोत्तम खेळ अजून व्हायचा आहे.टॉप टेनमध्ये प्रवेश करणं एकवेळ सोपं आहे. पण ते स्थान टिकवून ठेवण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. 2009मध्ये तिच्यासाठी नवीन आव्हानं आहेत. हैदराबादमध्ये होणारी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि बॅडमिंटनमधली सर्वात महत्त्वाची स्पर्धा ती म्हणजे ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपवर्ष संपायला फक्त चार आठवडे बाकी असताना तिला सानियाला चांगली बातमी मिळाली. 2008 सालातच पहिल्या दहा जणात धडक मारण्याची तिची महत्त्वाकांक्षा तिने वेळोवेळी बोलून दाखवली होती.आणि ऑलिम्पिकमधे तिने दाखवलेली जिगर आणि सातत्यपूर्ण कामगिरी याच्या जोरावर सायनाने ही महत्त्वाकांक्षा पूर्णही केली. ताज्या क्रमवारीनुसार, अठरा वर्षांची सायना 49,471 पॉइंट्ससह दहाव्या स्थानावर आहे.