भारतात Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 192 results
VIDEO: सचिन तेंडुलकरने घेतले अजित वाडेकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

स्पोर्ट्सAug 17, 2018

VIDEO: सचिन तेंडुलकरने घेतले अजित वाडेकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. आज त्यांच्या स्पोर्ट्सफिल्ड अपार्टमेंट, वरळी सी फेस येथील निवासस्थानी सकाळी १० वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी चाहत्यांच्या रांगा लागल्या. सचिन तेंडुलकरही अजित वाडेकरांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला. वाडेकरांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, मुलं प्रसाद, विपुल मुलगी कश्मिरा असून मुलगा विपुल काल रात्री अमेरिकेहून भारतात आला. आज दुपारी १२ वाजता दादर येथील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. १९७१ चे वेस्ट इंडिज आणि इंग्लंडवरील विजय हे भारताच्या आजवरच्या क्रिकेट वाटचालीतील मैलाचे दगड मानले जातात. तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम फलंदाज आणि स्लीपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी वाडेकर यांची ख्याती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही वाडेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading