शोधा राज्य/ मतदार संघ

#भारतात

Showing of 27 - 40 from 175 results
SPECIAL REPORT : पाकिस्तान करू शकतो अण्वस्त्रांचा वापर?

बातम्याFeb 28, 2019

SPECIAL REPORT : पाकिस्तान करू शकतो अण्वस्त्रांचा वापर?

27 फेब्रुवारी : भारताच्या हवाई हल्ल्यामुळे हादरून गेलेला पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो. या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्रं आहेत. त्यामुळे पाकिस्तान तिरिमिरीत त्याचा वापर करणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भारतात लष्करावर राजकीय अंकुश आहे तर पाकिस्तानात राजकीय सत्ता लष्कराच्या हातातलं बाहुलं आहे आणि लष्कर हा दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे.भारताला वेळोवेळी अण्वस्त्राची धमकी देण्यापर्यंत त्याची मजल जाते. 2001च्या संसद हल्ल्यानंतर भारत-पाकमध्ये तणाव वाढल्यानंतर पाकिस्ताननं लहान लहान शस्त्रं मिसाईलच्या सह्हयाने पाठवण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे अण्वस्त्र शस्त्र उल्लंघनाचा ठपका येणार नाही, असा त्यांचा होरा होता. आताही पाकिस्तान भारताचा डोळा चुकवून असाच काही आततायी निर्णय घेईल का याची चर्चा सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close