#भारतात

Showing of 170 - 175 from 175 results
सेन्सॉर बोर्डानं प्रमाणित केलेल्या ' देशद्रोही ' सिनेमावरील बंदी योग्य आहे का ?

May 13, 2013

सेन्सॉर बोर्डानं प्रमाणित केलेल्या ' देशद्रोही ' सिनेमावरील बंदी योग्य आहे का ?

प्रांतीय वादावर आधारित असलेला दिग्दर्शक कमाल खान यांच्या ' देशद्रोही ' सिनेमावर महाराष्ट्रात पोलिसांनी बंदी आणली आहे. सेन्सॉर बोर्डानं प्रमाणित केलेला हा चित्रपट महाराष्ट्र वगळता देशभरात प्रदशिर्त होत आहे. यावरच 'आजचा सवाल 'मध्ये चर्चा करण्यात आली. यावर बोलण्यासाठी ' देशद्रोही ' सिनेमाचे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता कमाल खान, मनसेचे नेते संदीप देशपांडे, सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य रामदास फुटाणे यांना आंमत्रित करण्यात आलं होतं. सेन्सॉरनं परवानगी दिलेली असताना या सिनेमावर पोलिसांनी बंदी घालणं कितपत योग्य आहे, हा चर्चेमधील मुख्य मुद्दा होता. सिनेमावर महाराष्ट्रात असलेल्या बंदीबाबत बोलताना कमाल खान म्हणाले, सिनेमावरील बंदी योग्य नाही. कोणतंही कारण न देता पोलिसांनी ही बंदी घातली आहे. आक्षेप असलेली दोन दृश्यं कापून तो चित्रपट प्रदशिर्त करता आला असता. मनसेनंही त्याला विरोध केला नव्हता. ' देशद्रोही ' सिनेमावर संदीप देशपांडे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली. 'मनसेनं कधीच विरोध केला नव्हता. आमच्या लेखी या चित्रपटाचं काहीच महत्त्व नाही. केवळ मनसेच्या नावाचा उपयोग करुन सिनेमासाठी स्टंटबाजी करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या प्रोमोजवर तब्बल 7 कोटी खर्च करण्यात आले आहेत.पण मुंबईत केवळपाच चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदशिर्त होत आहे. उत्तर भारतात हा सिनेमा चालण्यासाठीच मुंबईत ही स्टंटबाजी करण्यात आली ', असं संदीप देशपांडे म्हणाले. ही स्टंटबाजी नसून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात झाली. जानेवारीमध्ये ते पूर्ण झालं. तेव्हा मुद्दा नव्हता', असं कमाल खान म्हणाले. सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य असलेले रामदास फुटाणे चित्रपटाबाबत म्हणाले, चित्रपटाचे प्रोमोज भडक आहेत. ही दृश्य पाहून कटुता वाढण्याची शक्यता असल्यामुळे ही बंदी लावली असण्याची शक्यता आहे. याबाबत सिनेमाची बाजू कमाल खान यांनी मांडली. 'टीव्हीवर दाखवण्यात येत असलेले प्रोमो सेन्सॉर बोर्डानं प्रमाणित केले आहेत. मनसेचा विरोध नसताना चित्रपटावरील बंदीमागे राजकीय हेतू असल्याचं ते म्हणाले.सेन्सॉर बोर्डानं प्रमाणित केलेल्या ' देशद्रोही ' सिनेमावरील बंदी योग्य आहे का ? या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 86 टक्के लोकांनी ' हो ' असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले की प्रांतीयवादाच्या राजकारणाचा फायदा घेऊन ' देशद्रोही ' सिनेमा प्रकाशझोतात आला, ही दुर्देवाची गोष्ट आहे. प्रत्येकाला अविष्कार स्वातंत्र्य आहे. पण त्याचवेळी लोकांनी प्रगल्भ राहिलं पाहिजे. लोकांनी जागरूक राहून ज्या गोष्टीचं जेवढं मोल आहे, तेवढंच दिलं पाहिजं.

Live TV

News18 Lokmat
close