#भारतात

Showing of 118 - 131 from 147 results
मी भ्रष्टाचाराला वैतागलो आहे म्हणून..!

बातम्याAug 19, 2011

मी भ्रष्टाचाराला वैतागलो आहे म्हणून..!

अमेय तिरोडकर, मुंबई 19 ऑगस्टअण्णा हजारे यांना देशातून परदेशातून पाठिंबा मिळत आहे. लाखो लोक अण्णांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत.मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन करणारे अनिल शर्मा हे त्यापैकी एक. अमेरिकेमधील आपला व्यवसाय सोडून शर्मा भारतात परतले तेव्हाच इंडिया अगेन्स्ट करप्शन ची चळवळ सुरू झाली होती. आल्या दिवसापासून शर्मा या संस्थेशी जोडले गेलेत. आपला व्यवसाय काही दिवस बंद ठेवून या चळवळीच्या समर्थनासाठी ते आझाद मैदानात साखळी उपोषण करत आहेत. शिवाय, आपल्या परिसरात चळवळ लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हातभारही लावत आहे. अनिल शर्मा म्हणतात, "मी सकाळी वॉक ला जातो तेव्हा स्टीकर लावतो,बॅनर लावतो. तुम्ही वरळी ला जे बघता ते स्टीकर मी लावले आहेत रविंद्र पाटील भलेही शरीराने अपंग असतील पण, भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्याचा त्यांचा निर्धार बुलंद आहे. अपंगांसाठी मिळणार्‍या टेलिफोन बूथचे ते मालक आहेत. पण, आपल्यासारखे अनेकजण हा व्यवसाय बाजूला ठेवून आंदोलनात उतरतील हा त्यांना विश्वास आहे. टेलिफोन बूथ धारक रविंद्र पाटील म्हणतात, देशातील पावणे दोन लाख अपंग या लढ्यात अण्णांच्या बाजूने उतरतील.राकेश सुर्वे मुंबईत ज्वेलरी उद्योगात काम करतात. पण, पावलोपावली गाठ पडणार्‍या भ्रष्टाचाराने ते हैराण आहेत. म्हणूनच या लढाईत ते आपल्यासारख्या अनेकांसाठी अण्णांसोबत उतरले आहेत. "जो सतत भ्रष्टाचार दिसतोय त्यामुळे मी वैतागलोय. तो कमी व्हावा म्हणूनच मी इथे आहे. असं मत राकेश सुर्वे यांनी व्यक्त केलं. महादेव चव्हाण व्यवसायाने सिव्हील इंजिनीयर आहेत. पण, भ्रष्टाचार विरोधातल्या या लढाईत आपलाही सहभाग असावा असं त्यांना वाटतं. त्यासाठीच. घोषणा देऊन थकणार्‍या आंदोलकांना पाणी देण्याचे काम त्यांनी स्वत:हून स्वीकारले. या आंदोलनातला उत्साह त्यांना भुरळ घालतोय. सत्तर वर्षांनंतर अशी घटना घडत आहे. आणि एका माणसासाठी सगळे जण इथे जमले आहे. हे चैतन्य अनुभवण्यासाठी मी इथे आलोय. हे खरंतर, पुढच्या पिढीवरचे संस्कार आहेत "भ्रष्टाचाराच्या विरोधात उतरलेली ही माणसं एरव्ही साधी आहेत. आपण भलं नि आपलं काम भलं असं म्हणत मुंग्यासारखी मेहनतीने जगणारी आहेत. पण, ती एकदा एकत्र आली की सत्तेला हादरे देणारं मुंग्यांचे महाभारत कसं घडतं याचा अनुभव सध्या अवघा देश घेतोय.

Live TV

News18 Lokmat
close