#भाजप

Showing of 40 - 53 from 1639 results
VIDEO : काँग्रेसचे कृपाशंकर सिंह झळकले भाजपच्या पोस्टरवर

व्हिडिओJan 14, 2019

VIDEO : काँग्रेसचे कृपाशंकर सिंह झळकले भाजपच्या पोस्टरवर

जोनपूर, 14 जानेवारी : उत्तर प्रदेशातील जोनपूरमध्ये कृपाशंकर सिंहांची छबी भाजपच्या मंत्र्यांसोबत पोस्टर्सवर विराजमान झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कृपाशंकर हे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. तसंच कृपाशंकर आणि मुख्यमंत्र्यांची जवळीकही वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतला काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा भाजप आपल्या गळाला लावणार काय? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी कृपाशंकर सिंह उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, संजय निरुपम यांनीही उमेदवारी दाखल केल्यास नव्या वादाला तोंड फुटू शकतं. म्हणून उत्तर प्रदेशातील जोनपूर मतदारसंघात कृपाशंकर सिंहांसाठी हा 'प्लॅन-बी' असावा असा कयास लावला जात आहे.

Live TV

News18 Lokmat
close