News18 Lokmat

#भंडारा

Showing of 339 - 352 from 389 results
भंडार्‍यातील 'त्या' मुलींवर बलात्कार झाला नाही -गृहमंत्री

बातम्याMar 19, 2013

भंडार्‍यातील 'त्या' मुलींवर बलात्कार झाला नाही -गृहमंत्री

19 मार्चमुंबई : भंडारा हत्याप्रकरणातल्या तीन बहिणींवर बलात्कार झाला नाही अशी माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यंानी विधान परिषदेत दिली. फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आलाय. मृत मुलींच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यास प्रकरण सीबीआयकडे देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. या मुलींवर बलात्कार झाल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. फॉरेन्सिक अहवालात 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला नसल्याचं म्हटलं गेलं आहे. या तिन्ही मुलींचा मृत्यू हा विहिरीत पडून आणि बुडून झाल्याचं म्हटलं आहे. पण याअगोदर आलेल्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये या तिन्ही मुलींवर बलात्कार झाल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे या दोन्ही रिपोर्ट्समध्ये तफावत असल्याचं उघड होतंय.