#ब्रिटन

VIDEO : नाशिकच्या माणसाचा सोनेरी सदरा, अंगावर तब्बल 9 कोटींचं सोनं!

व्हिडिओApr 6, 2019

VIDEO : नाशिकच्या माणसाचा सोनेरी सदरा, अंगावर तब्बल 9 कोटींचं सोनं!

प्रशांत बाग, नाशिक, 06 एप्रिल : हौसेला मोल नसतं..हे आज पुन्हा एकदा समोर आलं आहे. निमित्त होतं गुढीपाडवा मुहूर्तावर सोनं खरेदीचं. नाशिकमधील गोल्ड मॅन पंकज पारख आज सोनं खरेदीसाठी सराफ बाजारात आले होते. लहानपणापासूनच सोन्याची प्रचंड आवड असलेल्या पंकज यांच्या अंगावर तब्बल 4 किलो दागिने रोज असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोन्याचा शर्टही तयार केला होता. तसंच गळ्यात हार, दोन्ही हातातील 10 बोटात अंगठ्या, हातात कडं आणि ब्रेसलेट असा त्यांचा सोनेरी थाट असतो. विशेष म्हणजे, या आवडी मुळेच या गोल्ड मॅनची अमेरिका, ब्रिटन,जपान आणि चीनमधील मीडियानंही दखल घेतली. गुढीपाडवा मुहूर्तावर सोनं खरेदी ही अत्यंत चांगली गुंतवणूक असल्याचंही या गोल्ड मॅनने सांगितलं. त्यांच्या या अनोख्या छंदाची थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालेली आहे.