#बेधडक

Showing of 742 - 749 from 749 results
'मी शेतकर्‍यांची जमीन लाटली नाही'

बातम्याOct 19, 2012

'मी शेतकर्‍यांची जमीन लाटली नाही'

19 ऑक्टोबरही जमीन माझी नाही आणि माझ्या मालकीचीही नाही. ही सरकारच्या मालकीची आहे. मी शेतकर्‍यांच्या जमिनी लाटलेल्या नाहीत, त्या सरकारकडेच आहेत तसंच घाडगेंची जमीन मला नाही तर संस्थेला लीजवर मिळाली असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय. तसेच अजित पवारांसोबत कोणतंही साटंलोटं नाही, पवारांसोबत सर्वच राजकारण्यांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच 2014 ला आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी केली.अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांना भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बेधडक उत्तरं दिलीत. आयबीएन-लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे.