#बेधडक

Showing of 27 - 40 from 704 results
VIDEO : अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या टपरीवाल्याला अश्रू अनावर

व्हिडिओFeb 8, 2019

VIDEO : अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या टपरीवाल्याला अश्रू अनावर

जितेंद्र जाधव, बारामती, 09 फेब्रुवारी : आपल्या हटके वागण्यासाठी अजितदादा नेहमीच चर्चेत असतात. दादांना शुक्रवारी पान खायची तलफ आली आणि मग काय विचारता...त्यांनी थेट पानाची टपरी गाठली. बारामतीच्या त्या गार वाऱ्यात अजित पवार पान खाण्यासाठी पणदरे इथल्या एका छोट्या पान स्टॉलवर थांबले. मोकळ्याढाकळ्या स्वभावाच्या अजितदादांनी पानवाला पान बनवेपर्यंत त्याच्याशी हवापाण्याच्या गप्पासद्धा मारल्या. तसंच दुकानात कोणतं पान मिळतं इथपासून ते किती धंदा होतो, अशी सगळी विचारपूसही केली.पानवाल्यानं पान बांधल्यानंतर मस्तपैकी पानाचा तोबरा भरला. अजित पवार म्हणजे बिनधास्त, बेधडक व्यक्तिमत्व...गावरान, रांगडा स्वभाव...त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून ते नेहमी बिनधास्तपणाचं दर्शन घडवत असतात. परिवर्तन यात्रेवेळी त्यांनी आपला डाएट बाजूला ठेवत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात जेवणावर ताव मारला होता.

Live TV

News18 Lokmat
close