#बुलंदशहर

शौचालयाच्या टाईल्सवर गांधींचा फोटो, VIDEO व्हायरल

व्हिडीओJun 5, 2019

शौचालयाच्या टाईल्सवर गांधींचा फोटो, VIDEO व्हायरल

बुलंदशहर, 05 जून : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथल्या शौचालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि राष्ट्रध्वजातील अशोक चक्राची प्रतिमा असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही शौचालयं बांधण्यात आली आहेत. बुलंदशहरमधील इच्छावरी गावातला हा प्रकार आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी एका अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. या टाईल्स आता काढून टाकण्यात आल्या आहे.