#बीसीसीआय

Showing of 261 - 274 from 286 results
बीसीसीआय 4 क्रिकेटर्सवर नाराज

बातम्याMay 17, 2010

बीसीसीआय 4 क्रिकेटर्सवर नाराज

17 मेटी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम सेमी फायनलपूर्वीच आऊट झाली. आणि टीम मॅनेजर रणजीत बिस्वाल यांनी आपला रिपोर्टही दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयला सादर केला. या रिपोर्टवर आज बीसीसीआयमध्ये चर्चा झाली. आणि चर्चेनंतर 'आयबीएन-नेटवर्क'ला मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय 4 भारतीय क्रिकेटर्सवर नाराज आहे. युवराज सिंग, रोहीत शर्मा, रवींद्र जाडेजा आणि आशीष नेहरा यांचे विंडिजमधील वागणे बेशिस्तीचे होते, असे बीसीसीआयमधील काही अधिकार्‍यांचे मत बनले आहे. या तिघांच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह आहे. अर्थात अधिकृतपणे अजून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि या खेळाडूंची चौकशी होणार का, किंवा त्यांच्यावर काय कारवाई होणार, हेही अजून स्पष्ट झालेले नाही.