#बीसीसीआय

Showing of 248 - 261 from 263 results
बीसीसीआयने मोदींना फटकारले

बातम्याApr 17, 2010

बीसीसीआयने मोदींना फटकारले

17 एप्रिलआयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांना बीसीसीआयने चांगलेच फटकारले आहे. दिल्ली ते धर्मशाला या विमानप्रवासादरम्यान मोदी आणि बीसीसीआयच्या सदस्यांची चर्चा झाली. शशांक मनोहर, निरंजन शाह, राजीव शुक्ला, अरुण जेटली आणि एन. श्रीनिवासन या चर्चेत सहभागी झाले होते. धर्मशाला इथे पोहोचल्यानंतर हे बीसीसीआय सदस्य आणि मोदी एकाच हॉटेलमध्ये राहिले नव्हते. मॅचदरम्यानही त्यांच्यात दुरावा होता. या दोघांमधील चर्चेतील काही प्रमुख मुद्दे असे होते... मोदी यांनी ट्विटरवर आयपीएलची माहिती उघड केल्याबद्दल बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मोदी यांची पाठराखण केल्याबद्दल सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले धर्मशालेत मॅचनंतर बीसीसीआयचे सदस्य आणि मोदी यांच्यात चर्चा झाली यावेळी मोदींना मीडियापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आपण काहीही अतिरेक केला नसल्याचे सांगत मोदींनी यावेळी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला दुबईत सोमवारी होणार्‍या आयसीसीच्या बैठकीत मोदींनी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करावे, असेही त्यांना सांगण्यात आल्याचे समजते.