#बिहार

Showing of 92 - 93 from 93 results
गप्पा शेखर देशमुख आणि श्रुती पोहनेरकरशी

देशDec 18, 2008

गप्पा शेखर देशमुख आणि श्रुती पोहनेरकरशी

' सलाम महाराष्ट्र 'मध्ये मुक्त पत्रकार शेखर देशमुख आणि गायिका श्रुती पोहनेरकर यांच्या गप्पा ऐकायला मिळाल्या. 18 डिसेंबर या दिवसाची युनोनं आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस अशी घोषणा केली आहे. त्यानिमित्ताने स्थलांतरीत लोकांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये शेखर देशमुख आले होते. शेखर हे मुक्त पत्रकार आहेत. ते गेली 15 वर्षं पत्रकारितेत आहेत. 2005 मध्ये त्यांना एच.आय.व्ही. एड्स भारतातली वस्तुस्थिती या विषयावर संशोधन करण्यासाठी हेन्‌री जे.कैसर फाऊंडेशन ची फेलोशीप मिळाली होती. सध्या ते स्थलांतरितांच्या प्रश्नावर संशोधन करताहेत. त्यानिमित्त उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, हरयाणा, पं.बंगाल इथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष या प्रश्नाचा अभ्यास केला आहे. स्थलांतरितांच्या प्रश्नावर संशोधन करण्याच्या मिळालेल्या संधीबाबत शेखर देशमुख सांगतात, " 2005 मध्ये मला एच.आय.व्ही. एड्स भारतातली वस्तुस्थिती या विषयावर संशोधन करण्यासाठी हेन्‌री जे.कैसर फाऊंडेशन ची फेलोशीप मिळाली होती. त्यानिमित्ताने मला भारतातल्या निरनिराळ्या भागात जाण्याची संधी मिळाली. भारतातल्या निरनिराळ्या गावांना भेटी देत असताना त्या गावांतली विदारक परिस्थिती मला पहायला मिळाली.गावातला कमावता वर्ग आहे किंवा जी पिढी आहे ती गाव सोडून शहराकडे आली आहे. या गावांमधला बराचसा जो प्रश्न आहे तो स्थलांतराशी निगडीत आहे. ज्या टप्प्यानं या लोकांचं स्थलांतरण चालू आहे, ते पाहता गावात समृद्धी यायला हवी. लोकांची प्रगती व्हायला हवी. पण तसं काही झालेलंच नाही. या स्थलांतरणाच्या प्रश्नाबरोबरीनं लोकांच्या इतर समस्यांमध्ये कमालीची वाढ होत आहे. स्थलांतरणाच्या प्रश्नाकडे लोकांचं पुरेसं लक्ष वेधलेलं नाहीये. तो कोणाच्या लक्षात आलेला नाही. त्यामुळे स्थलांतरणाच्या प्रश्नाचा अभ्यास करायचं ठरवलं. " सलाम महाराष्ट्रमध्ये शेखर देशमुख स्थलांतरित स्त्रियांच्या प्रश्नावरही बोलले. स्थलांतरितांचे हक्क-अधिकारही त्यांनी सांगितले.' सलाम महाराष्ट्र 'मध्ये औरंगाबदची गायिका श्रुती पोहनेरकरही आली होती. ती संगीत विशारद आहे आणि तिनं म्युझिकमध्ये बीए केलंय.हिंदी आणि मराठीबरोबरच इंग्लीश गाण्यांचीही तिला आवड आहे. शिवाय पोवाडा आणि गोंधळ अशा लोकसंगीताच्या प्रकारांचाही तिनं अभ्यास केला आहे. श्रुतीला अगदी लहानपणापासून गाण्याची आवड आहे. श्रुतीची प्रेरणा तीची आई. तिच्या आई-वडिलांनी तिला इतकं प्रोत्साहन दिलं की तिनं गाण्यातंच करिअर करायचं ठरवलं आहे. श्रुतीनं ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये लोकगीतं गायलीत. मुक्तपत्रकार शेखर देशमुख यांनी स्थलांतरित लोकांविषयी सांगितलेली माहिती आणि श्रुती पोहनेरकरने गायलेली गाणी व्हिडिओवर ऐकता येईल.