#बिहार

Showing of 625 - 633 from 633 results
लढा भ्रष्टाचाराशी (भाग - 2)

बातम्याDec 9, 2008

लढा भ्रष्टाचाराशी (भाग - 2)

नुकतीच वर्तमानपत्रांमधून ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलतर्फे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल छापून आला आहे. या सर्वेक्षणानुसार 180 भ्रष्टाचारी देशांमधे भारताचा नंबर 85वा आहे. दक्षिण आशियातील सर्वाधिक भ्रष्ट देश म्हणून भारत ओळखला जातो. या सर्व्हेतून बिहार हा सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचं समोर आलं आहे. 22जुलै रोजी संसदेत विश्वासदर्शक ठराव चालू असताना नोटांची बॅग आणली होती, तेव्हा खुलेआम करण्यात आलेला भ्रष्टाचार सर्वांनी खुलेआम पाहिला आहे. म्हणजे हा पंचायतीपासून संसदेपर्यंत पोहोचलेला भ्रष्टाचार देशानं पाहिला आहे. 9 डिसेंबर या जागतिक भ्रष्टाचार निर्मुलन दिनानिमित्त भ्रष्टाचार या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी ' टॉक टाईम 'मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार जन आंदोलन समितीचे सचिव अल्लाउद्दीन शेख आले होते. जागतिक भ्रष्टाचार निर्मुल दिनाविषयी अल्लाउद्दीन शेख सांगतात, " जर शोषणमुक्त आणि अत्याचारविरहीत समाज निर्माण करायचा असेल तर निश्चित भ्रष्टाचाराशी लढा असायला पाहिजे. भ्रष्टाचाराशी लढा दिला तर भारत भ्रष्टाचारमुक्त देश म्हणून ओळखला जाईल. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेने भ्रष्टाचाराशी लढा द्यायला सज्ज झालं पाहिजे. भ्रष्टाचारामध्ये विविध प्रकार आहेत. भ्रष्टाचाराचा अर्थच असा होतो की भ्रष्ट आचरण. कार्यपद्धती दोषपूर्ण असणं हाही भ्रष्टाचारचा एक प्रकार झाला. देवाण-घेवणीच्या नावावर केला जाणाारा भ्रष्टाचार, विकासाच्या कामामध्ये होणारा भ्रष्टाचार, शासनाच्या धोरणांमध्ये असणारा भ्रष्टाचार आणि सांस्कृतिक भ्रष्टाचार हे भ्रष्टाचाराचे 4 प्रकार आहेत. या चार प्रकारांना आपल्याला भ्रष्टाचाराचे प्रकार म्हणता येणार नाहीत. तर हे भ्रष्टाचारे 4 टप्पे आहेत. या 4 टप्प्यांमध्ये देवाण घेवाणीच्या नावावर खालीसर्वात जास्त भ्रष्टाचार होतो. अल्लाउद्दीन शेख यांनी सांगितलेली भ्रष्टाचाराच्या निर्मुलनासाठी काही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. ती व्हिडिओवर पाहता आणि ऐकता येईल. भ्रष्टाचार विरोधात तक्रारीसाठी संपर्क-नवीन प्रशासकीय इमारत, मादम कामा रोड, मंत्रालय, मुंबई. तक्रार कोणाकडे कराल ?महसूल आयुक्तमंत्रालय आयुक्तलोकायुक्तउपलोकायुक्त