बिबट्या

Showing of 196 - 209 from 233 results
बिबट्याने घेतला चार वर्षाच्या चिमुरड्याचा बळी

बातम्याFeb 27, 2012

बिबट्याने घेतला चार वर्षाच्या चिमुरड्याचा बळी

27 फेब्रुवारीऔरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात बिबट्याने एका चार वर्षाच्या चिमुरड्याचा जीव घेतला. ही घटना जामठी गावाजवळच्या हिंगणा शिवारातील आहे. शिवारातल्या शेतवस्तीवर युसूफखाँ बिसमिल्हाखाँ गेल्या दहा वर्षांपासून राहतात. शनिवारी रात्री ते त्यांच्या कुटुंबासह आपल्या झोपडीसमोरच्या ओट्यावर झोपले होते. त्यांची पत्नी सायराबी आपला चार वर्षांचा मुलगा अफझलखाँ याला घेऊन झोपली होती. रात्री बिबट्या तिथे आला. पहाटे पाचच्या सुमाराला कसल्यातरी कुरबुरीनं सायराबीला जाग आली तेव्हा बिबट्या चिमुकल्या मुलाला ओढत असल्याचं सायराबीनं पाहिलं. सायराबीनं आरडाओरड केली, मुलाला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्याने मुलाला घेऊन जंगलात धूम ठोकली. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी शोध मोहीम सुरु केली. अखेर पाच तासांनंतर त्यांना जंगलात चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading