#बिग बी

Showing of 300 - 313 from 318 results
आयफा आणि अमिताभ बच्चन यांचे संबंध बिघडले

बातम्याJan 17, 2011

आयफा आणि अमिताभ बच्चन यांचे संबंध बिघडले

17 जानेवारीअमिताभ बच्चन आणि आयफा आता वेगळे झालेत आयफा ऑर्गनायझर्सना आपली सेवा नको असल्यानं आपण आयफामधून बाहेर पडत असल्याचं त्यांनी ट्विटरवर कडक शब्दात लिहिलं आहे. अर्थात आयफा ऑर्गनायझर काही हे मान्य करत नाही. परदेशात होणारा आयफाचा रंगतदार सोहळा सगळ्यांच्याच आकर्षणाचा भाग असतो. त्यात आयफाचा अँबेसिडर अमिताभ बच्चन असणं ही महत्त्वाची गोष्ट होती. गेली दहा वर्ष या सोहळ्याचा चेहरा बिग बी होते. पुढचा आयफा सोहळा टोरँटोला होणार आहे. आणि तिथे बिग बी नसतील. गेल्या वर्षी आयफा सोहळा श्रीलंकेत झाला आणि त्यावेळीही अमिताभ बच्चन यांची गैरहजेरी खटकली होती. अर्थात आता आयफा आणि बिग बी यांच्यातला वाद चांगलाच रंगणार असं दिसतं आहे.