News18 Lokmat

#बिग बी

Showing of 274 - 287 from 301 results
बच्चन कुटुंबीयांच्या घरी आली 'नन्ही परी'

बातम्याNov 16, 2011

बच्चन कुटुंबीयांच्या घरी आली 'नन्ही परी'

16 नोव्हेंबरगेल्या अनेक दिवसांपासून अख्या बॉलिवूड जगताला आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना लागेलेली प्रतिक्षा अखेर आज संपली. आज सकाळी बच्चन कुटुंबाची सुन ऐश्वर्या राय- बच्चन हीने सकाळी 9.40 वाजता कन्यारत्नाला जन्म दिला. मुंबईतल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोमवारी संध्याकाळी ऐश्वर्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 'पा' अभिषेक बच्चनने सर्वात पहिले टिवट्‌रवर टिवट करून 'इट्स ए बेबी गर्ल' असं टिवट केलं. आणि काही सेकंदानी खुद्द बिग बी यांनी बातमीला दुजोरा देत 'मी एका गोंडस मुलीचा आजोबा झालो' असं टिवट केलं.ऐश्वर्याला मुलगा होणार की मुलगी यावर बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. एव्हान बच्चन परिवारात 11-11-11 च्या मुहूर्तावर नवा पाहून घरात प्रवेश करलं असं भाकीत रचलं जातं होतं मात्र असं काही झालं नाही. यानंतर 14 नोव्हेंबर बालदिनी हा नवा पाहून येईल अशी आशा उपस्थित केली गेली. मात्र हे सर्व टाळतं आज सकाळी ऐश्वर्यांने कन्यारत्नाला जन्म दिला. ऐश्वर्याला सोमवारीच सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटल बाहेर ऐश्वर्याच्या फॅननीही चांगलीच गर्दी केली होती. मात्र हॉस्पिटल व्यवस्थापनाला अधिक सुरक्षेची वाढ करण्यात यावी आणि ही बातमी बाहेर सांगू नये असं बच्चन परिवाराने अगोदरच सुचना देऊ केल्या होत्या. आज सकाळी 'पा' अभिषेक बच्चनने टिवट्‌रवरकडून ही गोड बातमी दिली.