#बावधन

पुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ

व्हिडीओAug 24, 2019

पुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ

पुणे, 24 ऑगस्ट : पुण्यातील बावधनमध्ये गाड्यांना धडक देणाऱ्या महिलेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. या महिलेनं पिंपरी चिंचवडमध्ये लष्करातील जवानांना गाडीतून उतरून अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात बावधन मध्ये दारू पिऊन चारचाकीला धडका दिल्या. एवढंच नाही तर तिथं आलेल्या पोलिसांनाही तिनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती.