बाळ

Showing of 508 - 521 from 528 results
अभिमान भारताचा - प्रजासत्ताक दिनाचं खास फीचर

बातम्याJan 26, 2009

अभिमान भारताचा - प्रजासत्ताक दिनाचं खास फीचर

26 जानेवारी 2009 ला भारत 59 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यानिमित्त 'आयबीएन लोकमत'चं प्रजासत्ताक दिनाचं खास फीचर - सालदार ते ऑर्थोपेडिक सर्जन : डॉ. संजय जाधवांच्या प्रेरणादायी प्रवास26 जानेवारी, नाशिकदीप्ती राऊतसरकारचे जावई म्हणून आरक्षणाच्या संधीची पूर्वी हेटाळणी केली गेली. आणि आता या आरक्षणासाठी भलेभले धडपडत आहेत. पण घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं आरक्षण नेमकं कशासाठी होतं? सालदाराचा मुलगा ते ऑर्थोपेडीक सर्जन हा संजय जाधव यांचा प्रवास एकाच पिढीत पाहायला मिळणं हे केवळ आरक्षणामुळेच शक्य झालं.एसटी स्टॅण्डवर गोळ्या विकणं, हॉटेलमध्ये कपबशा विसळणं, आणि रोजगार हमीच्या कामावर दगडं फोडणं... या वाटेवर सुरू झालेल्या एका सालदाराच्या मुलाचा प्रवास आज जे ऍण्ड जे ऍक्सीडंट हॉस्पिटल ऍण्ड नर्सिंग होमच्या मालकपदापर्यंत पोहोचला आहे. हे शक्य झालंं ते केवळ एका चार अक्षरी शब्दामुळे, आरक्षणामुळे. "आरक्षण नसतं तर आज मी गाईम्हशी वळत राहिलो असतो." असं संजय जाधव यांनी सांगितलं.चांदवड तालुक्यातल्या जाधवांच्या कुटुंबातले शाळेच्या पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेले ते पहिलेच. पण हा पहिला नंबर त्यांनी अभ्यासातही कायम राखला. अगदी एमबीबीएस आणि एमएस पर्यंत! ते नवबौद्धांमधले पहिले ऑर्थोपेडीक सर्जन. आज स्वत:च्या हॉस्पिटलसोबत त्यांनी एक पतसंस्था सुरू केली आहे आणि एक वसतीगृहही. "आरक्षणविरहीत समाज, समानता निर्माण करण्यासाठी समाजात जे असमान आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. असमान माणसाला संधी उपलब्ध झाली तर त्यानं संधीचं सोनं केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे" असं डॉ. संजय जाधव म्हणाले.डॉक्टर जाधवांच्या या वाटचाली बद्दल त्यांचाच शब्दात सांगायचं तर... माझी आई भाकरी भाजता भाजता, चुलीतला निखारा फुलवत होतीतेव्हा मी भाकरीची लढाई शिकत होतो.माझी आई मोळी विकता विकता, उद्याच्या भाकरीची तजवीज करत होतीतेव्हा मी नवं अर्थशास्त्र शिकत होतो.डॉ. पत्कींचं स्टेमसेल्ससंदर्भात नवं संशोधन26 जानेवारी, मुंबईअलका धुपकरस्टेम सेल्स म्हणजेच मूळ पेशींसंदर्भात कोल्हापूरमध्ये पुन्हा एक नवीन संशोधन करण्यात आलं आहे. गरोदरपणामध्ये सुमारे 20 टक्के स्त्रियांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास होतो. त्यामुळे अवेळी होणारा गर्भपात, आई किंवा बाळाचा मृत्यू असे धोके त्यातून संभवतात. पण आईच्या हाडांमधल्या स्टेम सेल्स आईच्या वारेमध्ये सोडल्या तर हा आजार संपूर्ण बरा करता येणार आहे. डॉ. सतीश पत्की यांनी 15 स्त्रियांवर हा क्लिनिकल रिसर्च यशस्वी केलाय.विजया आणि अजित खराडे नवी मुंबईचे. पण डिलिव्हरीसाठी ते कोल्हापूरला डॉ. पत्की यांच्याकडे गेले. विजयाला सुरु झालेल्या हाय ब्लड प्रेरशच्या उपचारांसाठी. "माझे पहिले पाय दुखायचे, कंबरेत दुखायचं पण ट्रीटमेंटनंतर सगळं बंद झालं." असं विजया खराडे यांनी सांगितलं. खराडे यांचं बाळ म्हणजे डॉक्टरांच्या संशोधनाचं यश आहे. कारण डॉक्टरांचं संशोधन फक्त जर्नलपुरतं मर्यादित न राहता सर्वसामान्य पेशंटना त्याचा उपयोग झाला आहे. गर्भाशय आणि गर्भनलिकेमध्ये स्टेम सेल्स असतात, असं संशोधन यापूर्वी डॉ. पत्की यांनीच केलेलं. गर्भाशयातल्या या स्टेमसेल्स गरोदरपणाच्या काळात आईच्या वारेकडे प्रवास सुरु करतात. पण ज्या स्त्रियांमध्ये स्टेम सेल्स कमी असतात त्या स्त्रियांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास सुरु होतो. "पेशंटच्या स्वताच्या बोन मॅरोमधुन किंवा मज्जा पेशीमधुन स्टेम सेलचा उपयोग करुन गरोदरपाणातील ब्लड प्रेशर अतीशय कमी होतं.असं सिद्ध करता आलेलं आहे.अता सध्या भारतामधेचं नव्ह तर जगामध्ये सगळ्या देशामध्ये गरोदरपणामध्ये वाढलेलं प्रेशर माता मृत्यू. बाल मृत्यूचं हे प्रमुख कारण आहे. हे जर उपचार केले बाल मृत्यू आणि माता मृत्युचं प्रमाण कमी करता येईल." असं डॉ. पत्की यांनी सांगितलं.ही ट्रीटमेंट एक दिवसाची असते. गरोदरपणाच्या पाच ते सात महिन्याच्या काळात ती करता येते. स्त्रीच्या हाडांमधल्या 200 दशलक्ष स्टेम सेल्स गर्भाशयात इंजेक्शनने सोडल्या जातात. त्यासाठी सोनोग्राफी तंत्र वापरलं जातं. केंद्र सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि पुण्याच्या पेशी विज्ञान संस्थेनेही डॉ. पत्की यांच्या या संशोधनामध्ये सहभाग घेतला आहे. तिस्ता सेटलवाड यांचं शैक्षणिक कार्य25 जानेवारी मुंबईप्रीती खान 1976 पासून सेक्युलर हा शब्द भारताच्या घटनेचा भाग बनलाय.सर्वांनी मिळून मिसळून रहावं या आग्रहाची सुरुवात शाळेतल्या पुस्तकांपासून होते. पण आपले अभ्यासक्रम दुर्लक्षित आहेत. शिक्षणात विशेषत: इतिहास हा विषय धर्मनिरपेक्ष विचारांनी शिकवल्यास आपल्या समाजात परिवर्तन नक्की होईल. हे परिवर्तन घडवण्यसाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रयत्नशील आहेत. तिस्ता सेटलवाड यांच्या सेक्युलर ध्यासाचा एक रिपोर्ट.तिस्ता सेटलवाड यांच्यामते, शिवाजी महाराज लोकप्रिय राजे होते. ते केवळ त्यांच्या धामिर्क नीतीविषयी लोकप्रिय नव्हते. तर त्यांनी जे आर्थिक आणि सामाजिक नीतीचे मुद्दे मांडले त्यामुळे ते जनतेत प्रिय होते. पण काही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात होते असं लिहलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या मते इतिहासाची समतोल ओळख फक्त सेक्युलर पुस्तकांमधूनच होऊ शकते.म्हणूनच मुलांना धर्मनिरपेक्ष इतिहास शिकवणं महत्त्वाचं आहे.त्यांच्या याच विचारातून शोध या पाठ्यपुस्तकांची निर्मिती झाली. आणि तयार झाले इन्टरॅक्टीव्ह मॉडेल्स ज्यांच्यामुळे मुलं धर्मनिरपेक्ष, समतोल इतिहासाचे धडे गिरवू लागले. त्या सांगतात, सर्वधर्म समभावाचे धडे मुलांनी लहानपणापासूनच गिरवायला हवे. याकरिता आम्ही ट्रिप्स काढतो हिंदू मुलांना मुस्लिम कम्युनिटीमध्ये फिरवतो आणि मुस्लिम मुलांना हिंदू कम्युनिटी मध्ये फिरवतो.अनुभवातनं मुलं बदलतात तसंच शालेय अभ्यासक्रमामुळेही.ऑलिम्पिकमधली लक्षवेधी कामगिरी24 जानेवारीस्वाती घोसाळकर स्वतंत्र भारताच्या क्रीडा इतिहासात क्रिकेट नंतर सर्वाधिक महत्व मिळालं ते ऑलिम्पिकला. या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वाट्याला अनेक असे क्षण आले जेथे अवघ्या भारतानं खेळाडूंचं यश हे वैयक्तीक यश समजून साजरं केलं. या निम्मिताने अवघा भारत एक झाल्याचं सगळ्या जगानं पाहिलं.भारताने ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवला ते हॉकीच्या रुपात. भारतीय हॉकी टीमने 1928 ते 1956 अश्या सलग सहा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलवर कब्जा केला होता. तो काळ भारतीय हॉकीसाठी सुवर्णकाळ होता.स्वतंत्र भारतासाठी ऑलिम्पिकमधलं पहिलं वैयक्तीक ऑलिम्पिक मेडल मिळवुन दिलं ते खाशाबा जाधव यांनी. खाशाबांनी 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावलं होतं. याच साली भारताने हॉकीमध्ये गोल्ड मिळवलं.यानंतर 1956 साली मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारतानं गोल्ड मेडलची कमाई केली. तर 1960 साली सिल्व्हर 1964 साली गोल्ड, 1968 साली ब्रॉन्झ, 1972 साली म्युनीच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर ब्रॉन्झ मेडल लागलं. 1980 साली मॉस्कोला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीत गोल्ड मेडल पटकावलं पण ते हॉकीतलं शेवटचं गोल्ड मेडल ठरलं.1980नंतर भारताचा ऑलिम्पिकमधला प्रवास फारसा समाधानकारक नव्हता. पण 1996च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये टेनिस प्लेअर लिएंडर पेसने भारतीय फॅन्सना एक सुखद धक्का दिला. ब्राझिलियन फर्नांडो मेलिगेनीचा तीन सेटमध्ये पराभव करत लिएंडरने ब्रॉन्झ मेडल पटकावलं. भारताचं दुसरं वैयक्तिक मेडल.अटलांटानंतर झालेल्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताने मेडलची कमाई केली. 2000 साली सिडनीमध्ये भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टींग प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावलं. कोणत्याही महिला खेळाडुकडून भारताला मेडल मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.2004चं ऑलिम्पिक गाजवलं ते राज्यवर्धन सिंग राठोडनं. शुटींगच्या डबल ट्रॅप प्रकारात राठोडनं सिल्व्हर मेडल कमवलं. आर्मीमध्ये असणार्‍या राज्यवर्धनच्या या कामगिरीमुळे बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताचं नेत्तृत्व करायची संधी मिळाली. 2008 मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतानं तीन वैयक्तिक मेडलची कमाई केली. अभिनव बिंद्रा, सुशील कुमार आणि विजेंदर कुमारच्या कामगिरीनं भारतीय ऑलिम्पिक इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला. देशासाठी जवान घडवणारं कोल्हापूरचं ' सैनिक टाकळी गाव ' 23 जानेवारी, कोल्हापूर प्रताप नाईक देशाच्या सीमांवरती आपले सैनिक डोळ्यात तेल घालून उभे असतात. म्हणून आपण सुरक्षितपणे इथे राहू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं सैनिक टाकळी हे 6 हजार लोकसंख्येचं गाव आहे. त्या गावातल्या प्रत्येक घरातला एकतरी मुलगा सैन्यात जातोच जातो. गेल्या 100 वर्षांपासूनची ही अविरत चालू आहे. देशातलं असं एकही लष्करी तळ नसेल जिथं या गावातला जवान तैनात नाही. गावात कितीतरी वीरपत्नी आणि वीरमाता बघायला मिळतात. सुलाताई पाटीलनी लग्नानंतर सहा महिन्यांत आपला पती देशासाठी अर्पण केलाये. वीरमाता लक्ष्मीबाई पाटील यांनी काळजावर दगड ठेवून आपल्या चारी मुलांना भारतमातेच्या संरक्षणासाठी पाठवलंय. " त्यांच्या आठवणींनी जीव व्याकुळ होतो. पण काही इलाज नाही, " ही वीरपत्नी सुलाताई पाटील यांची खंत आहे. एवढंच नव्हे तर एकाच घरातील सलग तीन पिढ्या देश सेवेसाठी कार्यरत असल्याचं या गावात बी.एस.पाटील यांच्या रुपानं पाहायला मिळते. कारण यांचे वडील आर्मीत, ते स्वत: नेव्ही आणि आता आपला मुलगाही नेव्हीत पाठवून देशासाठी असणारा अभिमान दाखवून दिलाये. " आमच्या गावावर देशसेवेचा प्रचंड पगडा आहे. आमच्या गावातली मुलं जेव्हा सुट्ठीवर परत येतात तेव्हा ते सोबत साहस कथा घेऊन येतात. त्या त्यांच्यापेक्षा लहान मुलांना ऐकवतात. मग आपसुकच देशप्रेम आणि देशसेवेचं बीज गवातल्या लहानग्यांच्या मनावर रुजतं, " अशी माहिती लेफ्टनंट सबमॅरीनर बी.एस. पाटील यांनी दिली. या गावातील 200 सैनिक सध्या सीमेवर आपलं कर्तव्य बजावण्यात दक्ष आहेत. शत्रूशी दोन हात करताना आतापर्यंत या गावातील 18 जवानांनी देशासाठी आपलं बलिदान दिलंय. या जवनांची आठवण अखंडपणे तेवत राहावी यासाठी ग्रामस्थानी स्वखर्चातून स्मारक उभारलंय. या स्मारकाच्या रुपानं शहीद झालेल्या जवानांची आठवण ग्रामस्थ अखंडपणे ठेवणार आहेत. कारण येणार्‍या पिढीनंही आपले योगदान देशसेवेसाठीचं द्यावं असं त्यांना सांगायच आहे. सातारचं भोंडवडे गाव : पंचायतराज कायद्याचं प्रतीक 22 जानेवारी, सातारासाधना राव ग्रामीण भागातील लोकसहभागाशिवाय ग्रामस्वराज्य येणार नाही, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. 73 व्या घटना दुरूस्तीनंतर 1994 ला पंचायतराजचा कायदा आला आणि त्यादृष्टीनं पावलं पडायला सुरुवात झाली. पंचायतराज कायद्याचा आधार घेत एखादं खेडं कसं विकसित होऊ शकतं, इहे सातारा जिल्ह्यातल्या भोंडवडे गावाला भेट दिल्यावर लक्षात येतं. भोंडवडे गावात अवघी दीडशे घरं आहेत. गावात निर्मलग्राम योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली नि गाव वर्षभरात टँकरमुक्त झालं. लोकसहभाग आणि यशस्वी कारभारामुळे हे शक्य झालं आहे. भोंडवडेच्या सरपंचपदी तीन वर्षांपूर्वी अनुसया गुजर यांची बिनविरोध निवड झाली. आणि भोंडवडेची वाटचाल विकासाकडं सुरू झाली. सुरुवातीपासूनच त्यांनी गावकर्‍यांनासोबत घेऊनच विकास साधला. सरपंच अनुसया गुजर सांगतात , "गावचा प्रमुख प्रश्न होता पाण्याचा. पूर्वी पाण्याकरता खूप लांब जायला लागायचं. डबड्यातून पाणी गोळा करायला लागायचं. गावात पाणी आल्यानं आता वर्षाला तीन पिकं घेता आली. महिलांची पायपीट थांबली."पाण्यानंतर प्रश्न होता स्वच्छतेचा. गावात सांडपाण्यातून परसबागा फुलवल्या आहेत. भोंडवळे गावच्या निर्मलग्राम योजनेमुळे गावात शौचालयं झाली. गावात आता महिलाराज पहायला मिळतं कारण गावातल्या पुरुषांनी अर्धांगिनींना मदतीच्या हाताबरोबरच समान अधिकारही दिले आहेत. घराची पुरुषांबरोबरच स्त्रियांची संयुक्त मालकी आहे. पंचायतराजचा कायदा आला तेव्हा महिलांना राजकारण, अर्थकारण कळत नाही त्यांचा रबरस्टँपसारखा वापर होईल अशी टीका झाली. पण, लोकसहभागातून ग्रामविकास साधणार्‍या गावकर्‍यांचं भोंडवडे गाव हे आदर्श गाव झालं आहे. या गावात लोकसहभागामुळे सत्तेचं खरखुरं विकेंद्रीकरण झालं. पुरुषांसाठीही संततीनियमनाच्या गोळ्या 22 जानेवारी, मुंबई अलका धुपकरआतापर्यंत गर्भ प्रतिबंधक गोळ्या या फक्त महिलांसाठीच होत्या. पुरुषांना संतती नियमनासाठी नसबंदी शस्त्रक्रिया किंवा काँडमचा वापर करावा लागतो. पण अमेरिकेत ओख्लीहोमा विद्यापीठात केवीन मूर यांनी केलेल्या संशोधनामुळे येत्या काळात पुरुषांसाठीही संततीनियमन गोळ्या तयार होऊ शकतील. मूर यांनी हे संशोधन उंदरावर केलंय. या संशोधनाविषयी डॉ. राजन भोसले सांगतात, " उंदरामधल्या स्पर्ममध्ये जे एनझायम म्हणजेच वित्तंचक असतात. त्यातले टीपीएस वन आणि टीपीएस टु दडपता येतात. त्यानं सप्रेसही करता येतं. त्यामुळे गर्भ धारणा होणार नसल्याचं आढळून आलं आहे. उंदाराप्रमाणे असे वित्तंचक माणसातही असतात." हे एन्झाईम्स गर्भधारणेत महत्त्वाची भूमिका बाजवतात. डॉ. राजन भोसले सांगतात , " शरीरात असंख्य वित्तंचक असतात. त्यापैकी गर्भधारणेसाठी दोन उपयोगी पडतात. ज्यावेळी शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात जातो त्यावेळी त्याला भेदण्याचं काम हे वित्तंचक करतात आणि शुक्राणू जो पोहत पुढे प्रवास करत असतो तो सुद्धा हालचाल करायला या वित्तंचकामुळेच मदत होत असते. तो सप्रेस झाला तर शुक्राणू हलणार नाही आणि गर्भधारणा होणार नाही." या वित्तंचकानं पुरुषाच्या पौरुषात्वावर कसलाही परिणाम होणार नसल्याची खात्रीही डॉ. राजन भोसले यांनी दिली. तसंच पुरुषांसाठी संतती नियमाच्या गोळ्या आल्या तर त्यानं मोठी सामाजिक क्रांती घडेल, असंही ते म्हणाले. गर्भधारणा होउ नये, यासाठी संशोधन यशस्वी झाल्यानंतर गोळ्या बाजारात यायला मात्र काही वर्ष वाट पहावी लागणाराय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading