बाळ

Showing of 443 - 456 from 503 results
डॉक्टरांच्या संपामुळे 5 दिवसांच्या बाळाचा मृत्यू

बातम्याOct 14, 2011

डॉक्टरांच्या संपामुळे 5 दिवसांच्या बाळाचा मृत्यू

14 ऑक्टोबरवर्ध्यात मॅग्मोच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संपामुळे सिव्हील हॉस्पिटलमधले एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. डॉक्टर संपावर गेलेत पण त्यांच्या या संपामुळे एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. उपचार न झाल्यामुळे पाच दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला. संपामुळे गेल्या 8 दिवसात दोन रुग्ण दगावले आहेत. हिंगणघाट तालुक्यातील शिरुडमधल्या आशा वानखेडे यांनी 9 ऑक्टोबरला बाळाला जन्म दिला.12 ऑक्टोबरला तिला डिस्चार्ज दिला.पण रात्रीतून बाळाची तब्येत खराब झाली. त्यामुळे त्या पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेल्या. पण त्यांना डॉक्टर संपावर असल्याचं सांगण्यात आलं. नर्सनीसुद्धा उपचार करायला नकार दिला. आणि यामुळे 5 दिवसांचं बाळ दगावलं. दरम्यान गेले तीन दिवस राज्यामध्ये सरकारी राजपात्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचा संप सुरु आहे. पण आरोग्य विभागाने अजून याविषयावर कुठलीही कारवाई केलेली नाही. पण या बाळाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं नव्हतं असं म्हणतं हॉस्पिटल प्रशासनानं जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading