बाळ

Showing of 404 - 417 from 421 results
आहार मुलांसाठी (भाग : 2)

बातम्याJan 19, 2009

आहार मुलांसाठी (भाग : 2)

टॉक टाइममध्ये या वेळचा विषय होता लहान मुलांचा आहार. या विषयावर बालरोगतज्ज्ञ डॉ.हेमंत जोशी यांनी संवाद साधला. लहान मुलांचा आहार काय आणि कसा असावा याविषयी ते बोलले. डॉ. हेमंत जोशी सांगतात, " 18 वर्षांच्या वयापर्यंत मुलांची सतत वाढ होत असते. प्रत्येक घरात एक बाळ कोपरा असला पाहिजे. ज्यात मुलांसाठी दाणा-पाणी असलं पाहिजे. जशी गाडीला पेट्रोल टाकी असते त्याप्रमाणे मुलांच्या कपड्यांना खिसे असावेत. मुलं खाऊ शकतील आणि त्यांचा हात पोहोचेल असा खाऊ घरी भरलेला हवा. "" घरात नेहमी फळं ठेववीत. पालेभाज्यांमधून जीवनसत्त्वं मिळतात. प्रत्येक वेळी भाज्यांचा हट्ट आईनं करू नये. हातानं खाणं हा मुलांचा जन्मसिध्द हक्क आहे. एकदम न खाता दिवसभर थोडंथोडं खावं. घराबाहेर खाणं टाळावं आणि नियमीत लस घ्यावी,सर्दी,खोकला,ताप आलेल्या नातेवाईकांपासून दूर रहावं, " असंही डॉक्टरांनी सांगितलं. आईनं जास्तीत जास्त नवनवीन पदार्थ करावेत. म्हणजे मुलांचा खाण्यातला रस वाढेल, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला. ' टॉक टाइम ' मध्ये डॉक्टरांनी केलेलं मार्गदर्शन पाहण्यासाठी व्हिडिओ क्लिक करा.