Elec-widget

#बातम्या

Showing of 73139 - 73152 from 74765 results
गप्पा प्रा.मंजुश्री पाटील यांच्याशी (भाग - 2)

बातम्याDec 9, 2008

गप्पा प्रा.मंजुश्री पाटील यांच्याशी (भाग - 2)

' सलाम महाराष्ट्र 'मध्ये मंजुश्री पाटील होत्या. मंजुश्री पाटील या आर्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य आहेत. शिक्षकांसाठी त्या वेगवेगळे प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतात. विशेषत: इंग्लिश भाषा कशा तर्‍हेने शिकवावी याचे प्रशिक्षण वर्ग त्या घेतात. डी एड केल्यानंतर त्यांनी टीचर्स ट्रेनिंग या विषयात एम.एड. केलंय. याशिवाय त्या उत्तम गातातही. त्यांच्याशी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या अनुभवांविषयी ऐकायला मिळालं...मंजुश्री पाटील शिक्षकांसाठी इंग्रजी ट्रेनिंगचे वर्ग घेत आहेत. त्या वर्गांबद्दल मंजुश्री पाटील सांगतात, " शिक्षकांसाठी मी इंग्रजी प्रशिक्षणाचे वर्ग घेते. त्याचबरोबरीने मुलांना कोणतीही गोष्ट शिकवायची याचंही प्रशिक्षण मी शिक्षकांना देते. हे प्रशिक्षण हॅण्डस् ऑन, अ‍ॅक्टिव्ह लर्निंग या प्रकारतलं असतं. कारण आता अशी वेळ आलेली आहे की, मुलांना कोणताही विषय चॉक अ‍ॅण्ड टॉक किंवा पुस्तकी शिक्षण प्रकाराने न शिकवता अ‍ॅक्टिव्ह लर्निंगचा वापर करून इंग्रजीच नाही तर प्रत्येक विषय शिकण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे मुलांत मुल होऊन शिकवण्याची वेळ आलेली आहे. माझे ट्रेनिंग प्रोग्रॅम असे असतात की टीचर काहीतरी करत असतात, अ‍ॅक्टीव्हली उड्या मारत असतात, माझ्या ट्रेनिंग वर्गांमध्ये शिक्षक मुलांचा त्यांच्या शिकवण्याच्या कामामध्ये अ‍ॅक्टिव्हली उपयोग करत असतात. ते मुलांत मुल होऊन त्यांना शिकवतात. ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये जे शिक्षक शिकतात ते त्यांच्या चांगलंच स्मरणात असतं. हा प्रयोग ते आपल्या शाळेत करतात. माझ्या ट्रेनिंग प्रोग्रॅममध्यल्या शिक्षकांनी केलेले प्रयोग त्यांच्या वर्गांमध्ये यशस्वीपणे राबवले आहेत. माझ्या ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये शिक्षकांना हे सांगणं असतं की मुलांना चार भिंतीत बंदिस्त करून त्यांच्यावर अजिबात भाषणबाजी करू नका. त्याने मुलं कंटाळणार आणि त्यांची वाढ ही साचेबद्ध असणार आहे. " हे सांगताना त्यांच्या चेह-यावर जे समाधान उमटलं ते त्या शिक्षकांच्या प्रयत्नांचं कौतुक होतं. शिक्षकांचं प्रशिक्षण करताना मंजुश्री पाटील यांना निरनिराळे अनुभव व्हिडिओवर पाहता आणि ऐकता येईल.