बातम्या

Showing of 71397 - 71410 from 80094 results
मुंबईत पावसाची संततधार

बातम्याAug 30, 2010

मुंबईत पावसाची संततधार

30 ऑगस्टगेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून मुंबईत पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई शहरात गेल्या 24 तासांत सरासरी 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात 99 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा इथे आतापर्यंत 67.3 मिलीमीटर तर सांताक्रूझ इथे सगळ्यात जास्त म्हणजे 111 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिंदमाता, अंधेरी सबवे या सखल भागात पाणी साचले आहे. तर पावसामुळे मस्जिद बंदर इथे बिल्डिंगची भिंत कोसळली. मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र येत्या 24 तासांत जोरदार वार्‍यांसह काही ठिकाणी मुसळधार तर हलक्या - मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील असा कुलाबा वेधशाळेनं अंदाज वर्तवला आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरु आहे. शनिवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने, रविवारी जोर पकडला. मुसळधार पाऊस होत असला तरी कुठेही पाणी साचल्याची किंवा ट्राफिकमध्ये अडचण निर्माण झाल्याची बातमी नाही. ठाण्यात मुसळधारठाणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.यामध्ये अंबरनाथ शहराला पावसाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. अंबरनाथच्या सखल भागांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अंबरनाथच्या कोहोजगाव, कमलाकर नगर, बी केबीन रोड, कल्याण बदलापूर महामार्ग या भागात पाणी साचले होते. कमलाकर नगर आणि कोहोजगाव परिसरातील सुमारे 30 ते 40 घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने रहिवाशांच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालिकेने पावसाळ्यापूर्वी 13 लाख रूपये नालेसफाईसाठी खर्च केले होते. मात्र अंबरनाथच्या कोणत्याच परिसरात नालेसफाई न झाल्याने संबंधित विभागांमध्ये पाणी साचले आहे