#बातम्या

Showing of 69291 - 69304 from 71227 results
काश्मीरमध्ये युवाराज

बातम्याJan 5, 2009

काश्मीरमध्ये युवाराज

5 जानेवारी, जम्मू-काश्मीरजम्मू-काश्मीरचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जम्मू विद्यापीठातल्या झोरावर ऑडिटोरियम इथे शपथविधी समारंभ झाला. या कार्यक्रमात राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी काँग्रेसचे ताराचंद यांनीही जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ओमर यांच्याबरोबर काही मंत्र्यांनीही आज शपथ घेतली. ओमर अब्दुल्ला हा जम्मू आणि कश्मिरचा हा तरुण चेहरा. तरुणांमध्ये अंत्यत लोकप्रिय असलेल्या ओमर अब्दुल्लांकडून राज्यातील तरुणांना अपेक्षा आहेत. रोजगार निर्मीतीपासून ते काश्मिरचा तिढा सोडवण्यासारख्या सर्वच मुद्यांवर या विद्यार्थ्यांची चर्चा सुरु आहे. ओमर अब्दुल्ला यांनी या समस्यांवर उपाययोजना करावी आणि तीही झटपट करावी अशी या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. ओमर अब्दुल्ला यांनाही या अपेक्षांची जाणीव आहे. "माझ्यापुढे अनेक आव्हानं आहेत. 20 वर्षात दहशतवादामुळं झालेल्या जखमा भरुन काढायच्या आहे. माझ्या वयामुळे माझ्यापासून सर्वानाच अपेक्षा आहेत. त्या मी पूर्ण करेन अशी मला आशा आहे" असं ते म्हणाले. ओमर यांच्याकड एक तरूण पण तितकीच जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिल जातं. जम्मू-काश्मीरबरोबरच अनेक राजकीय अपेक्षांचं ओझ त्यांच्यावर असणार आहे. या अपेक्षांना ते कसे खरे उतरतात, याकडे सगळ्यांचच लक्ष असणार आहे