#बसपा

Showing of 1 - 14 from 30 results
तिहेरी तलाकच्या जोखडातून मुस्लीम महिलांची सुटका, हाच तो क्षण पाहा हा VIDEO

व्हिडीओJul 30, 2019

तिहेरी तलाकच्या जोखडातून मुस्लीम महिलांची सुटका, हाच तो क्षण पाहा हा VIDEO

नवी दिल्ली, 30 जुलै : तिहेरी तलाकच्या जोखडातून मुस्लीम महिलांची अखेर मोठ्या संघर्षानंतर सुटका झाली आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्यसभेत अखेर तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तिहेरी तलाक यापुढे कायद्यानं गुन्हा ठरणार आहे. लोकसभेत विधेयकाला आधीच मंजुरी मिळाली होती. मात्र, राज्यसभेत आत्तापर्यंत तिनदा विधेयक फेटाळण्यात आलं होतं. अखेर आज राज्यसभेत विधेयकाला मंजुरी मिळाली. 99 विरुद्ध 84 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आलं. जेडीयू, पीपीडी, अण्णा द्रमुक, बसपा,खासदारांनी सभात्याग करत आपला विरोध दर्शवला. त्यामुळे विधेयकाला मंजुरी मिळण्याचा मार्ग आणखी सुकर झाला.