बलात्कार Videos in Marathi

Showing of 118 - 129 from 129 results
'आरोपींना मरेपर्यंत तुरुंगात डांबण्यात यावं'

बातम्याDec 29, 2012

'आरोपींना मरेपर्यंत तुरुंगात डांबण्यात यावं'

29 डिसेंबरदिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित अतिशय धीट आणि साहसी तरूणीच्या स्मृतीला मी श्रद्धांजली अर्पण करते. ज्या पद्धतीने तिने लढा दिलाय. तिचं बलिदान वाया जाणार नाही. मला खात्री आहे सरकार,देशाची जनता,न्यायव्यवस्था ही भविष्यात अशी घटना होऊ देणार नाही याची काळजी घेतील असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केला. तसंच तिच्यावर झालेला अत्याचार हा अत्यंत चुकीचा आहे याबद्दल तरूणाईने पुकारलेलं आंदोलन योग्य आहे. अशा प्रकरणात गृहखात्याकडून अभ्यासपुर्वक तपास केला जातो आणि राष्ट्रपतींकडे अहवाल दिला जातो. राष्ट्रपतींकडे जरी दयेचा अर्ज केला तरी अशा दयेचा अर्ज फेटाळून त्या आरोपींना मरेपर्यंत तुरुंगात डांबले जाते या प्रकरणातील आरोपींनी फासावर लटकावण्यापेक्षा मरेपर्यंत तुरूंगात डांबण्यात यावं अशीही मागणी प्रतिभाताईंनी केली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading