बलात्कार

Showing of 1912 - 1925 from 1966 results
कुर्ला येथे 125 जणांची डीएनए टेस्ट

बातम्याJun 23, 2010

कुर्ला येथे 125 जणांची डीएनए टेस्ट

23 जून कुर्ला नेहरुनगर परिसरातील अल्पवयीन मुलींच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आता क्राईम ब्रँचच्या स्पेशल टीमने जोरात तपास सुरू केला आहे. या प्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी जाहीर केलेल्या स्केचच्या आधारे क्राईम ब्रँचने एका संशयीताला ताब्यात घेतले आहे. तसेच नेहरूनगर पोलीस स्टेशनमधील एका माजी पोलीस कर्मचार्‍याच्याच मुलाची डीएनए टेस्ट करण्यात आली आहे. तसेच इतरही 125 जणांची डीएनए टेस्ट करण्यात आली आहे. यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची खास टीम तयार करण्यात आली आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त रजनीश सेठ आणि क्राईमचे सहआयुक्त हिमांशु रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 28 पथके तयार करण्यात आली आहेत. रोज किमान पाच ते दहा जणांना पोलीस ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading