बदलापूर, 27 जुलै: मुसळधार पावसामुळे बदलापूर वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्रीपासून कासगाव इथे अडकली आहे. या एक्स्प्रेसमध्ये साधारण 1500 प्रवासी अडकले आहेत. यांच्या बजावासाठी एनडीआरएफची एक तुकडी दाखल झाली आहे. 90 लोकांची टीम आणि 12 बोटी घेऊन ही टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी पोहोचली आहे.