#बदलापूर

Showing of 157 - 163 from 163 results
प्रचाराचा आज शेवट

बातम्याApr 9, 2010

प्रचाराचा आज शेवट

9 एप्रिलनवी मुंबई, औरंगाबाद महापालिका, अंबरनाथ, तसेच बदलापूर नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबणार आहे. आज सर्वच पक्षांनी मोठ्या रॅलींचे आयोजन केले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सगळ्याच पक्षाच्या बड्या नेत्यांच्या प्रचार सभा या ठिकाणी झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईकरांना वाढीव एफएसआयचे दिलेले आश्वासन, त्यावर राष्ट्रवादीकडून चढवलेला प्रतिहल्ला यामुळे नवी मुंबई पालिका निवडणूक प्रचारात रंग भरला. राज ठाकरे आणि उध्दव ठाकरेंच्या जंगी रॅली या ठिकाणी झाल्या. तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही सगळ्याच पक्षांनी प्रचारात सिनेतारकांना उतरवून रंगत आणली. आता पुढच्या 2 दिवसांत पडद्यामागे काय हालचाल होतात, त्यावरच निवडणुकीची कल ठरेल, अशी चर्चा आहे. वाढप्यांसाठी नोकरी शोधा नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेले दिसले. ऐरोलीच्या प्रचारसभेत बोलताना, भुजबळांनी विरोधकांवर मार्मिक टीका केली. सानिया- शोएबच्या मुद्दावरून त्यांनी युतीला लक्ष्य केले. तर संजय राऊतांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. एवढेच नाही, तर मुख्यमंत्र्यांनाही टोला हाणायला भुजबळ विसरले नाहीत.वाढप्यांसाठी नोकरी शोधा, अशा शब्दांत भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले.गुंठेवारीचा प्रश्न सोडवू औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आली तर गुंठेवारीचा प्रश्न सोडवू असे, आश्वासन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले. औरंगाबादचे नाव बदलता येत नसेल, तर विमानतळाला संभाजीराजांचे नाव द्या, अशी मागणीही उध्दव ठाकरे यांनी केली. या जाहीर सभेत शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण केले. त्यात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समाचार घेतला. काही जण माझ्या हुबेहुब नकला करताहेत, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अशी टीकाही त्यांनी राज ठाकरेंवर केली. काँग्रेस कार्यकर्त्याला, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या मारहाणीचा मुद्दा विरोधकांनी प्रचारात लावून धरला. औरंगाबाद महापालिकेसाठी निवडणूक प्रचार करताना भाजप-सेनेच्या प्रमुख नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला. सत्तारला पाठीशी घालणार्‍यांवर सूड उगवा असे, आवाहन उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेनी मतदारांना केले.