फ्रायडे

Showing of 53 - 57 from 57 results
फ्रायडे रिलिज

बातम्याDec 19, 2008

फ्रायडे रिलिज

19 डिसेंबर, मुंबई गेल्या आठवड्यात ' रब ने बना दी जोडी ' रिलीज झाला. पुढच्या आठवड्यात गजनी रिलीज होणार आहे. यांच्यामध्ये पडण्याची रिस्क बॉलिवुडच्या मोठ्या सिनेमांनी घेतलेली नाही. त्यामुळे या वीकेन्डला बॉलिवुडचा फक्त एकच सिनेमा रिलीज झाला आहे. हॉलिवुडचे तब्बल चार आणि त्यापाठोपाठ एक मराठी सिनेमा आज प्रदर्शित झाले आहेत.'वफा ' सिनेमा आज रिलिज झाला आहे. काका राजेश खन्ना ब-याच दिवसांनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ' वफा 'मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सरा दिसणार आहे. या सिनेमातल्या बोल्डदृश्यांमुळे सिनेमाची जोरदार चर्चा आहे. विकेन्डला ' गिल्टी ' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. एड्स सारख्या महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकलेल्या या मराठी सिनेमात अनिकेत विश्वासराव, मधुरा वेलणकर, संतोष जुवेकर, शिवाजी साटम या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन कुमार सोहनींनी केलेलं आहे.या आठवड्यात ' मदागास्कर - एस्केप टू आफ्रिका ' , ' यस मॅन... ', ' हाय स्कूल म्युझिकल 3 - सिनियर इयर ', ' इन द नेम ऑफ द किंग ' हे चार हॉलिवुडपट रिलिज होत आहेत. ' मदागास्कर - एस्केप टू आफ्रिका ' हा हॉलिवुडचा अ‍ॅनिमेटेड सिनेमा आहे. सिनेमात कलंदर प्राण्यांना न्यूयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयात जायचं असतं. जंगलापेक्षा सर्व सुखसोयी असलेल्या प्राणी संग्रहालयात रहण्याची या प्राण्यांची इच्छा असते. प्राणीसंग्रहालयात जाण्यासाठी या प्राण्यांची जी काही धडपड चालू असते, त्याचं चित्रण ' मदागास्कर - एस्केप टू आफ्रिका ' या सिनेमात केलेलंआहे. ते बघणं म्हणजे मस्त टाईमपासच आहे. जिम कॅरी एक छान कॉमेडी सिनेमा घेऊन परत आला आहे. त्या सिनेमाचं नाव ' यस मॅन ' आहे. या सिनेमाचा हिरो एक नवं तत्वज्ञान घेऊन जगतो. कशालाही येस म्हणायचं, सगळ्यांना होकार द्यायचा आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात एकेक चमत्कारिक आणि मनोरंजक घटना घडायला लागतात. मग त्याला या येसचे तोटेही कळायला लागतात. जिम कॅरीबरोबर ब्रॅडली कूपर आणि झुली डेस्केनल सुध्दा आहेत. ब-याच दिवसांनी जिम कॅरी येत असल्यामुळे 'यस मॅन ' बघण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेली पोहोचली असणार. ' हाय स्कूल म्युझिकल 3 - सिनियर इयर ' हाही सिनेमा रिलिज झाला आहे. हा सिनेमा म्हणजे म्हणजे डिस्नेचा हाय स्कूल ड्रामा परत आला आहे. डिस्नेच्या या नव्या सिक्वलमध्ये आपल्याला ट्रॉय आणि गॅब्राइल भेटणार आहेत. हा म्युझिकल सिनेमा म्हणजे एक संगीतप्रेमींसाठी मेजवानी असणार आहे. या आठवड्यात ' इन द नेम ऑफ द किंग ' हाही सिनेमा रिलिज होत आहे. या सिनेमाची कथा ती एका राजाची आहे. हा वाईट शक्तींच्या ताब्यात आहे. त्याच्याच एक सेवकाच्या बायकोचं अपहरण होतं आणि तो सेवक तिची सुटका करतो, अशी या सिनेमाची कथाआहे. ' राजतिलक ' हा सिनेमा ' इन द नेम ऑफ द किंग ' या सिनेमाची हिंदी आवृत्ती आहे. एकंदरीत, या वीकेन्डला हॉलिवुडप्रेमींनाच जास्त चॉइस आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading