फेस्टिव्हल

Showing of 79 - 92 from 99 results
पुणे फिल्म फेस्टिव्हलचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

बातम्याJan 3, 2011

पुणे फिल्म फेस्टिव्हलचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

03 जानेवारी9 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील पुरस्कारांची घोषणा आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. 9 वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुण्यात 6 ते 13 जानेवारीला होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला आणि सायरा बानू यांना जाहीर झाला आहे. तर संगीतासाठी दिला जाणारा सचिन देव बर्मन पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना जाहीर झाला आहे. फिल्ममेकर सुभाष घई यांना या फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या बॉलिवूडमधील योगदानासाठी विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पुण्यात 6 जानेवारीला 9व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं उद्घाटन होणार आहे.