#प्रेरणा

Showing of 1 - 14 from 42 results
भाजीपाला विकणाऱ्या आईचा मुलगा झाला 'सीए'

बातम्याAug 11, 2018

भाजीपाला विकणाऱ्या आईचा मुलगा झाला 'सीए'

नितीन बनसोडे,लातूर 11 आॅगस्ट : ही कहाणी आहे, कोरडवाहू शेतीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची... आतापर्यंत अशा मृत्यूनतंर देशोधडीला लागलेल्या कुटुंबाच्या अनेक कहाण्या आम्ही तुम्हाला आजवर दाखवल्या आहेत. पण ही कहाणी आहे जिद्दीची...संघर्षाची. या साडीची किंमत भलेली हजार रुपये असेल पण तिचं मोल करता येणार नाही. ही साडी संघर्षाचं, जिद्दीचं प्रतिक आहे. मुलानं दिलेल्या या भेटीचं कौतूक आणि समाधान या माऊलीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतंय...कारण तिच्या कष्टाचं चीज झालंय..30 वर्षांचा वनवास संपलाय..आशाबाईंचा मुलगा नारायण चार्टड अकाऊंटंट अर्थात सीए झालाय. कोरडवाहू शेतीपुढे बापानं हात टेकले आणि मरणाला कवटाळं..पण बापाचं आभाळ हरपलेल्या लेकरांना पदराखाली घेत आशाबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या.अहमदपुरातील रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकत चिल्ल्यापिल्यांना भाकरीचा घास भरवला...परिस्थितीशी लढा देत शिक्षण आणि संस्कारही दिले. या चार भिंतीत पसरलेल्या गरिबीची पोरांना कधी लाज वाटली नाही, की कधी त्याचं गाऱ्हाणं मांडलं नाही. उलट त्याची जाणीव ठेवत नारायणनं जिद्दीनं शिक्षण पूर्ण केलं. नारायणच्या यशाचा त्याच्या मित्रांना अभिमान वाटतो. जिथं सग्या सोयऱ्यांकडून, गावकऱयांकडून पंक्तीलाही बसू दिलं जात नव्हतं तिथं या माऊलीनं आज मानाचं ताट मिळवलंय.अशी परिस्थिती असलेल्यांसाठीच नाही तर इतरांसाठीही या मायलेकरांच्या जिद्दीची कहाणी एक प्रेरणा आहे.

Live TV

News18 Lokmat
close