#प्रेमविवाह

SPECIAL REPORT : आंतरजातीय विवाह करणं पाप आहे का?

महाराष्ट्रMay 6, 2019

SPECIAL REPORT : आंतरजातीय विवाह करणं पाप आहे का?

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 06 मे : आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून घरच्यांनीच मुलगी आणि जावयाला पेटवून दिलं. अहमदनगरमधल्या निघोजमध्ये ही संताप आणणारी घटना घडली. यामध्ये दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या रुक्मिणी रणसिंग हिचा मृत्यू झाला तर तिचा पती मंगेश गंभीररित्या भाजला आहे. मुलीचे काका आणि मामाला अटक केली आहे. पण तिचे आई-वडील फरार आहेत.