News18 Lokmat

#प्रियंका गांधी

Showing of 118 - 122 from 122 results
बाळासाहेबांनी थोपटली राज ठाकरेंची पाठ, काँग्रेसवर टीकास्त्र

बातम्याSep 7, 2012

बाळासाहेबांनी थोपटली राज ठाकरेंची पाठ, काँग्रेसवर टीकास्त्र

07 सप्टेंबर'आझाद मैदानावरील धर्मांध मुसलमानांची दंगल पाहून मला शरम वाटते. पण नपुंसक सरकार राज्य करत असेल तर दुसरे काय होणार ? सोनिया गांधी आणि त्यांची पंचकडी यांच्या नाकर्तेपणामुळेच देशाची वाट लागली अशी घणाघाती टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. तसेच बाळासाहेबांनी पुतणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची पाठ थोपटली. जनता जोपर्यंत उठाव करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यात राजने एक मोर्चा काढला. ठीक आहे,उठली माणसं,पण नंतर बरोबर तोंडावरती बसणार. कशाकरिता हे श्रम घ्यायचे कोणी ? असं सांगत आता जनतेनं उठाव केला पाहिजे अशी साद बाळासाहेबांनी घातली. शिवसेनेचं मुखपत्र सामनाला बाळासाहेबांनी मॅरेथान मुलाखत दिली. या मुलाखतीत बाळासाहेबांनी चौफेर तोफ डागली. ज्या जनतेला मी उठवलं. जागं केलं. एक मंत्र दिला. एक जोश दिला. माणूस म्हणून तिला स्वाभिमानानं उभं केलं ती जनता आहे कुठे ? देशात सगळीकडे अंदाधुंदी, बेबंदशाही पण कुठे जनतेत जाग अशी नाहीच. या देशाला आता आकार, उकार राहिला नाही. इतके दरिद्री नेतृत्व या देशाला मिळाले आहे. जो पर्यंत ही पंचकडी म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी,अहमद पटेल, रॉबेट वडेरा ही घराणेशाही देशावर हुकूम गाजवत आहे त्यामुळे देशाची वाट लागली आहे. त्यासोनिया गांधींचा पुत्र राहुल पंतप्रधान व्हायची स्वप्न पाहत आहे. पंतप्रधानपद काय भेंडीबाजारतली खुर्ची समजतोय काय रे ? असा सवाल बाळासाहेबांनी केला. तसेच 11 ऑगस्ट सारख्या दंगली होतात कशा ? त्या आसाममध्ये बांग्लादेशींनी घुसखोरी केली त्याला चीनही पाठिंबा देत आहे. हे बांग्लादेशी घुसतात कसे तुम्हाला दिसतं नाही का ? तुम्ही इतके आंधळे झाला आहात का ? आसाममध्ये त्या हिंदू बोडोंचं चुकलं काय ? जे आपलं आहे त्यावर सुध्दा बोलायचं नाही. इंदिरा गांधींनी पाकिस्तानात घुसून बांग्लादेश स्वातंत्र केला. आसाम तर आपलाच भाग आहे.मग सैन्य काय करत आहे ? असा सवाल उपस्थित करत आपला रोख स्पष्ट केला. राज्यात दुष्काळ सगळीकडेच पडला आहे. विचारात दुष्काळ आहे. नेतृत्वात दुष्काळ आहे. हिमतीने कोणी काही करत नाही. हे राज्यकर्ते एकमेकांवर आरोप करत आहे. एकमेकांची धोतरं काय फेडता ? दुष्काळ कसा निपडून काढायचा. त्यावर विचार करा. चुकलं कसं ? असा टोलाही बाळासाहेबांनी लगावला. त्याचबरोबर बाळासाहेबांनी पोलिसांची बाजू घेतलीय.पोलिसांवर प्रचंड ताण आहे, 12-12 तास नोकरी, ना कुठला सण,ना उत्सव, ना मनोरंजन असते या लोकांना. पण ही लोकंही माणसंच आहे. राज्यकर्त्याचे मात्र छान चालले आहे त्यांना म्हणावं तुम्ही 12 तास राबून दाखवावं मग कळेल तुम्हाला. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. सध्या वयानुसार प्रकृतीची थोडी कुरबूर असते. धाप लागते पण मी ठणठणीत आहे. प्रकृत्तीने साथ दिली तर राज्यात पुन्हा रान उठवेन अशी गर्जनाही बाळासाहेबांनी केली.